पिंपरी, दि. १५ जुलै २०२४ :- महापालिकेच्या आस्थापनेवर कार्यरत असलेले अधिकारी किंवा कर्मचारी स्वतः क्षयरोग,कर्करोग, कुष्ठरोग अथवा पक्षाघात आदी आजारांनी ग्रस्त असल्यास आवश्यक ती कागदपत्रे तपासून देय असणारी विशेष रजा नियमानुसार मंजुर करण्याची कार्यवाही करण्यात यावी तसेच याबाबत तक्रारी आल्यास संबंधित अधिकारी अथवा कर्मचारी यांना जबाबदार धरण्यात येईल, असे महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने निर्गमित केलेल्या परिपत्रकाद्वारे सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कळविण्यात आले आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम, १९८१ च्या परिशिष्ट तीन मधील नियम ७९ मध्ये क्षयरोग, कर्करोग, कुष्ठरोग अथवा पक्षघात इत्यादी आजाराबाबत रजेच्या तरतुदी नमुद केलेल्या आहेत,या रजेच्या तरतुदी अधिकारी आणि कर्मचा-यांना लागू आहेत. परंतु पिंपरी चिंचवड महानगरपालिका आस्थापनेवरील कर्मचारी क्षयरोग, कर्करोग,कुष्ठरोग अथवा पक्षघात इत्यादी आजाराने ग्रस्त असलेल्या कर्मचा-यांच्या रजा तसेच त्यांना नियमानुसार देय असणारी विशेष रजा मंजूर करण्याची कार्यवाही होत नसल्याबाबतच्या काही तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्या अनुषंगाने स्वतंत्र परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे. तरतुदीनुसार आवश्यक कागदपत्रे तपासून देय असणारी विशेष रजा नियमानुसार मंजुर करण्याची कार्यवाही करण्यात यावी. याबाबत कर्मचा-यांची तक्रार आल्यास नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

0 Comments