Hot Posts

6/recent/ticker-posts

जिजाऊ ब्रिगेड आयोजित मोफत आरोग्य शिबिरास प्रचंड प्रतिसाद.

 

        पिंपरी चिंचवड रविवार दि.14 -: रोजी जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने सर्वांसाठी मोफत आयुर्वेदिक उपचार व औषध वाटप शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. ्डाॅ.डी.वाय. पाटील हाॅस्पिटल ऑफ आयुर्वेद,रिसर्च सेंटर,संत तुकाराम नगर येथे माजी नगरसेवक बबनराव गाढवे यांचे हस्ते शिबीराचे उदघाटन झाले.

बातमी आणि जाहिरातीसाठी संपर्क करा-: 9420032027

          यावेळी मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रकाश जाधव,डॉ.ममता नाकाडे,जिजाऊ ब्रिगेड पुणे विभागीय अध्यक्षा सुनिता शिंदे,शहराध्यक्षा सुलभा यादव,मराठा सेवा संघाचे दिलीप गावडे,पांडुरंग पोमण,राघव होजगे,चंद्रकांत शिंदे इत्यादी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

       सदर शिबीर डाॅ.डी.वाय.पाटील आयुर्वेदिक हाॅस्पिटलच्या सहकार्याने संपन्न झाले.या शिबीरात प्रमुख डाॅ.ममता नाकाडे,डाॅ.गणेश गायकवाड,डॉ. प्रशांत गनबोटे व त्यांचे सहकारी यांनी रुग्णांची तपासणी करून पुढील आयुर्वेदिक मोफत उपचार करून हाॅस्पिटलच्या वतीने मोफत औषध वाटप केले. या शिबिराचा पहिल्याच दिवशी पंचेचाळीस जणांनी लाभ घेतला.


       सदर शिबीर 22 जुलैपर्यंत आयोजित केले असून पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांनी मोठया प्रमाणात लाभ घ्यावा असे आवाहन आयोजिका सुलभा यादव यांनी केले.मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रकाश जाधव यांच्या हस्ते डाॅ.ममता नाकाडे व त्यांच्या सहकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

         शिबीर यशस्वी होण्यासाठी सुलभा यादव, अशोक भालेराव,विनोद खैरे,उज्ज्वला साळुंखे,माधुरी काळे,कौशल्या जाधव,संध्या भालेराव,सुरेखा शिंदे,सविता पोमण,संगीता गावडे,अंजली जगताप,प्रमिला ठोके यांनी विशेष परिश्रम घेतले.



Post a Comment

0 Comments