महाळुंगे दि.०५-: मौजे महाळुंगे तालुका खेड जिल्हा पुणे येथील इसम नामे अनिल उर्फ अण्णा तळवे वय 30 वर्ष हे त्यांचा भाचा प्रणय प्रदीप तुळवे वय 21 वर्ष यांचे सह दिनांक एक जुलै 2024 रोजी सायंकाळी सात वाजता चे सुमारास महाळुंगे बाजू कडून खालुम्ब्रे बाजुकडे मोटरसायकल वरून जात त्यांना एचपी चौक नजीक दबा धरून बसलेल्या विशाल पांडुरंग तळवे व त्याचे साथीदारांनी पूर्व वय मनशातून गणेश तिळवे यांच्यावर हल्ला करून त्याचे डोक्यावर पाठीमागील बाजूस कोयत्याने वार करून निर्गुण खून केला त्यावेळी त्यास सोडविण्यासाठी मध्ये येणारा गणेश याचा भाचा प्रणय ओवाळ याच्यावर जीवे ठार मारण्याचे उद्देशाने कोयत्याने चढवून आरोपी रिक्षा मधून फरार झाले होते. सदर घटनेवरून महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 419 /2024 भा.न्या.सं कलम 103 (1), 109, 249, 3(5), आर्म ऍक्ट 4, 25 क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ऍक्ट कलम 3,7 म पो अधि.क कलम 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर गुण्याचे गांभीर्य ओळखून लागलीच परिमंडळ ३ पोलीस उपनियो आयुक्त श्री शिवाजी पवार चाकण विभागाचे सहाय्यक पोलीस सहाय्यक श्री राजेंद्र सिंह गौर यांनी गुन्ह्याचे तपास संदर्भाने सूचना मार्गदर्शन केले त्यानुसार माळुंगे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते यांनी गुन्हे शोध पथकातील अंमलदार यांना सूचना देऊन तीन पथके तयार करून आरोपीचे शोध करिता रवाना केले खून करून फरार झालेले आरोपी लोणावळा मार्गे मुंबई येथे गेल्या बाबत तांत्रिक पुरावे व गोपनीय बातमीच्या आधारे माहिती झाल्याने तपास पथक मुंबई येथे पोहोचेपर्यंत आरोपींनी तेथून प्रसार झाले होते आरोपींचे ठाव ठिकाण याबाबत काही एक माहिती प्राप्त नसताना शोध पथकातील पोहवा तानाजी गाडे विठ्ठल वाडेकर किशोर सांगळे संतोष काळे यांना त्यांचे गोपनीय बातमीदार यांचे मार्फत माहिती प्राप्त झाली की सर्व आरोपी हे मौजे जांभवडे तालुका मावळ जिल्हा पुणे येथे एका घरात लपून बसले आहेत प्राप्त माहितीचे आधारे व कोणी नितीन गीते यांनी शोध पथकाचे मदतीला सपोनी कल्याण घाडगे व गुन्हे शोध पक्षातील अंमलदार यांना पाठवून आरोपींना लपलेल्या घरातून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे-:
1) विशाल पांडुरंग तुळवे वय 27 वर्ष राहणार खालुम्ब्रे तालुका खेड जिल्हा पुणे.
2) मयूर अशोक पवार वय तीस वर्ष राहणार समता कॉलनी तळेगाव दाभाडे, तालुका खेड जिल्हा पुणे.
3) रंजीत बाळू ओव्हाळ वय 22 वर्ष राहणार खालुम्ब्रे तालुका खेड जिल्हा पुणे.
4) प्रथम सुरेश दिवे वय 21 वर्ष राहणार द्वारका सिटी महाळुंगे तालुका खेड जिल्हा पुणे.
5) विकास पांडुरंग तुळवे वय 35 वर्ष राहणार खालुम्ब्रे तालुका खेड जिल्हा पुणे.
6) चंद्रकांत भिमराव तुळवे वय 38 वर्ष राहणार खालुम्ब्रे तालुका खेड जिल्हा पुणे.
7) सनी रामदास गुळवे वय 26 वर्ष राहणार खालुम्ब्रे तालुका खेड जिल्हा पुणे.
सदरची कार्यवाही माननीय पोलीस आयुक्त श्री विनयकुमार चौबे माजी अप्पर पोलीस आयुक्त श्री वसंत परदेशी माजी पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा श्री संदीप डोईफोडे मा पोलीस उप आयुक्त परिमंडळ 3 डॉक्टर शिवाजी पवार सहाय्यक पोलीस आयुक्त चाकण विभाग श्री राजेंद्र गौर यांचे सूचना व मार्गदर्शनानुसार महाळुंगे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री नितीन गीते सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री कल्याण घाडगे पोलीस अंमलदार तानाजी गाडे विठ्ठल वाडेकर किशोर सांगळे संतोष काळे गणेश गायकवाड शिवाजी लोखंडे अमोल बोराटे संतोष वायकर राजेंद्र खेडकर यांनी केले असून गुन्ह्याचा तपास सपोनी कैलास कुठे हे करीत आहेत.





0 Comments