प्रणय सुनील खैरे (वय १७) असे विद्यार्थ्याचे नाव आहे. तो भोसरीतील राजमाता जिजाऊ महाविद्यालयात विज्ञान शाखेत बारावीमध्ये शिकत होता.
कनिष्ठ महाविद्यालयामधील प्रकल्प अपूर्ण राहिल्याने तसेच प्रात्यक्षिक परीक्षा न दिल्यामुळे तो चिंतेत असल्याची माहिती मित्र व नातेवाइकांनी पोलिसांना दिली.
शुक्रवारी तो आईबरोबर महाविद्यालयात परिक्षेचे हॉल तिकीट आणण्यासाठी गेला होता. त्यानंतर आई बँकेत कामावर गेली. त्याचे वडील गावी गेले होते. घरात एकटा असताना त्याने टोकाचा निर्णय घेतल्याचे समजते.
अधिक भोसरी पोलिस तपास करीत आहेत. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.


0 Comments