Hot Posts

6/recent/ticker-posts

पुण्यात गांजा तस्करीसाठी वापरलेली कारसह मुद्देमाल जप्त.

        पुणे; दि.१७ (शशिकांत पाटोळे) : गुन्हे शाखा युनिट ५ पथकाने हवेली तालुक्यातील कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीत सराईत आरोपींकडुन ३४ किलो ४४० ग्रॅम वजनाचा गांजा व गांजा तस्करी करण्यासाठी वापरलेली ओरा कार हस्तगत करून एकुण १४ लाख ८३ हजार ८०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

       पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणी अक्षय पोपटराव पाडुळे (वय ३१, रा. बिल्डींग नंबर ११ फ्लॅट नंबर १०७, नविन म्हाडा कॉलनी, सुरक्षानगर, हडपसर, पुणे) व विशाल दत्तात्रय जाधव, वय २८, रा. वाडकर यांचे रुममध्ये भाडयाने ओढयाचे जवळ, हिंगणे मळा, हडपसर, पुणे) यांना अटक करण्यात आली आहे. पुणे शहरामध्ये होणाऱ्या अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या आरोपींवर कायदेशीर कारवाई करणेबाबत वरिष्ठ कार्यालयातुन वेळोवेळी सुचना देण्यात आलेल्या आहेत.

       त्या आदेशानुसार १४ फेब्रुवारी रोजी गुन्हे शाखा युनिट ५ पथकाचे पोलीस निरीक्षक संदीपान पवार व युनिट ५ तसेच ४ कडील पोलीस स्टाफ असे लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना गट नंबर ३८०, कृपासिंधु ईस्ट सोसायटीचे समोर सार्वजनिक रोडवर कदमवाक वस्ती, लोणी काळभोर, पुणे या ठिकाणी सराईत अक्षय पोपटराव पाडुळे व त्याचा साथिदार विशाल दत्तात्रय जाधव यांना (AURA)ओरा कार क्रमांक एमएच-१२ व्हीटी २००० सह ताब्यात घेवुन त्यांच्याकडुन विक्री करण्यासाठी आणलेला ३४ किलो ४४० ग्रॅम गांजा हा अंमली पदार्थ, गांजाची तस्करी करण्यासाठी वापरलेली ओरा कार तसेच एकमेकांना संपर्क करण्यासाठी वापरलेले मोबाईल असा एकुण १४ लाख ८३ हजार ८००रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करुन त्यांचेविरुध्द व इतर ३ फरार आरोपीं विरुध्द लोणी काळभोर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

        यांतील आरोपी अक्षय पाडुळे हा साकीनाका पोलीस स्टेशन, मुंबई येथे खुनाचा प्रयत्न गुन्हयामधील पाहिजे आरोपी असुन तो सुमारे १ वर्षापासुन पोलीसांना गुंगारा देवुन स्वतःची अटक चुकवित होता. सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक संदीपान पवार, गुन्हे शाखा युनिट ५, पुणे शहर, पोलीस उपनिरीक्षक अभिजीत पवार, वैभव मगदुम, पोलीस अंमलदार नासिर देशमुख, विनोद शिवले, प्रताप गायकवाड, अकबर शेख, शशिकांत नाळे, सुभाष आव्हाड, किशोर दुसिंग, वैभव रणपिसे, उमाकांत स्वामी, स्वाती तुपे, अमर चव्हाण, शहाजी काळे, राहुल ढमढेरे अविनाश इंगळे यांचे पथकाने केली आहे.

Post a Comment

0 Comments