Hot Posts

6/recent/ticker-posts

राष्ट्रीय थाई बॉक्सिंग चॅम्पियनशिप (प्रो लीग) महाबळेश्वर–पंचगणी येथे दि. ३० जानेवारी ते १ फेब्रुवारी 2026 दरम्यान यशस्वीरित्या संपन्न झाली.

.        महाबळेश्वर (प्रतिनिधी)-: या स्पर्धेत देशभरातून सुमारे ४०० ते ५०० खेळाडूंनी सहभाग नोंदवला आणि आपल्या उत्कृष्ट कौशल्याचे व दमदार कामगिरीचे सादरीकरण केले.

• या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत

🥇 प्रथम क्रमांक – महाराष्ट्र संघाने उत्कृष्ट क्रीडा प्रदर्शनासह पटकावला.

🥈 द्वितीय क्रमांक – छत्तीसगड संघाने मिळवला.

🥉 तृतीय क्रमांक – गुजरात संघाने प्राप्त केला.

🏅 चतुर्थ क्रमांक – कर्नाटक संघाने मिळवला.

         विजेत्या संघांना व खेळाडूंना भारतीय थाई बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष, श्री.पी. वाय.आत्तार सर (जनरल सेक्रेटरी – इम्रान  सर, उत्तरप्रदेश), तांत्रिक संचालक संतोष खैरनार सर, सोनावणे सर, पी.एस.आय. सातारा जिल्हा, तसेच वन अधिकारी राहुल निक्कम सर यांच्या शुभहस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली.

      महाराष्ट्र थायबॉक्सिंग असोसिएशन चे अध्यक्ष. श्री विशाल माळी सर, सचिव. श्री अजय खेडकर सर,  वरिष्ठ उपाध्यक्ष श्री.सागर कोळी सर, खजिनदार श्री. गणेश मांढरे सर, पुणे विभाग प्रमुख श्री अमोल माने सर, मुंबई विभाग प्रमुख हरी ओम चव्हाण सर ,यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या व अभिनंदन केले. 

      या चॅम्पियनशिपमध्ये पंच व रेफरी म्हणून  श्री. नजीम शेख सर ,श्री.अजय खेडकर सर, अरुणा हिवरकर आणि शुभांगी साहरे यांनी अत्यंत उत्कृष्ट व निष्पक्ष कामगिरी बजावली. तसेच, प्रोलिग रिंग फाईट मध्ये, प्रो बेल्ट व 11 हजार रुपयांचे रोख पारितोषिक बक्षीसांचे मानकरी ठरलेले पिंपरी चिंचवड परिसरातील विजयी  खेळाडूंची नावे खालील प्रमाणे. 

• मुली :- सई धायगुडे, सना शेख, सायली गाढवे, शरयू म्हात्रे, श्रेया भोसुरे

• मुले:-  अमित कुमार, इसक्की तेवर, असिफ शेख, ओम पांढरकर, साहील काळे, यासिर बागवान यांनी प्राप्त केले. 

 • या भव्य राष्ट्रीय स्पर्धेचे यशस्वी आयोजन..

       श्री. वझीर शेख व श्री.रवीराज गाढवे यांनी केले. त्यांच्या उत्कृष्ट व्यवस्थापनामुळे ही स्पर्धा अत्यंत शिस्तबद्ध व प्रेरणादायी ठरली.

      ही स्पर्धा भारतीय थाई बॉक्सिंगसाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरून, नवोदित खेळाडूंना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पुढे जाण्यासाठी प्रेरणा देणारी ठरली. 🥊🇮🇳


Post a Comment

0 Comments