पिंपरी (दि. 5 मे 2026) : पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे घडलेल्या अमानुष व संतापजनक घटनेच्या निषेधार्थ आज पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरात भव्य आंदोलन पार पडले. या आंदोलनाचे नेतृत्व लोकहितवादी सेवा संघाचे संस्थापक-अध्यक्ष धर्मराज बनसोडे यांनी केले.
या आंदोलनात संघटनेचे पदाधिकारी, व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलकांनी हातात फलक व बॅनर घेऊन “चिमुकलीला न्याय मिळालाच पाहिजे”, “दोषींना फाशी झालीच पाहिजे ” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. नसरापूर येथील घटनेविषयी सर्व स्तरांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.
आंदोलना दरम्यान सर्वांनी टीका करत म्हटले की, “अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये तात्काळ कठोर कारवाई झाली पाहिजे. गुन्हेगारांना वाचवण्याचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नाही. पीडित कुटुंबाला त्वरित न्याय मिळाला पाहिजे, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल.”
या वेळी महाराष्ट्र राज्य सचिव विशालभाई वाघमारे तसेच लोकहितवादी सेवा संघाचे पदाधिकारी अजिंक्यभाऊ वाघमारे, ऋषिकेश वाघमारे, निलेश कांबळे, मनोज पवार तसेच सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण शेलार, सोमनाथ कलाटे, प्रफुल्ला मोतलिंग, किशोर काळसकर, यांनीही आपली भूमिका स्पष्ट करत प्रशासनाकडे कठोर कारवाईची मागणी केली.
याशिवाय अनिल गाडे, अनिल मुळवाड , प्रथमेश सावंत, निलेश कदम, अमोल भालेराव, राजू वाडेकर, अनिता राठोड, शशिकांत गुप्ता, अक्षय पवार, राशीद सय्यद, सरफाराज खान, मिरज अन्सारी, मयूर कुंभार, अभिषेक काळे, दत्ता भोई, अतिश दुधावडे आदी लोकहीतवादी सेवा संघांचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आंदोलन शांततेत पार पडले असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.


0 Comments