Hot Posts

6/recent/ticker-posts

प्रशिक्षक विवेक मालशे यांचे यश अभिमानास्पद - अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे


• राष्ट्रीय डेफ क्रिकेट चॅम्पियनशीप स्पर्धेत मालशे प्रशिक्षक असलेल्या महाराष्ट्र संघाला मिळाले विजेतेपद

      पिंपरी दि. १२ नोव्हेंबर २०२५ : नवी दिल्ली येथे इंडीयन डेफ क्रिकेट असोसिएशन (आयडीसीए) तर्फे ९ व्या टी-२० राष्ट्रीय डेफ क्रिकेट चॅम्पियनशीप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्र मूकबधिर क्रिकेट संघाने जम्मू काश्मीर मूकबधिर क्रिकेट संघाचा ८ धावांनी पराभव करत विजेतेपद पटकाविले. या स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षक म्हणून पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मध्यवर्ती भांडार विभागाचे भांडारपाल विवेक मालशे मोलाचा वाट उचलला. या स्पर्धेत प्रशिक्षक या नात्याने मिळविलेल्या यशाबद्दल विवेक मालशे याचा अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.  

      यावेळी पिंपरी चिंचवड महापालिका कर्मचारी संघाचे खेळाडू राहूल चावरिया, सचिन लोणे, महेश कुदळे, ओंकार पवार, विनोद साळूंखे, कृष्णा चव्हाण,  योगेश साठे, निखिल आव्हाड, विजय बंडवाल, आकाश नामदे आदी उपस्थित होते. 

     यावेळी  अतिरिक्त आयुक्त खोराटे विवेक मालशे यांनी प्रशिक्षक म्हणून महाराष्ट्र संघाला विजय मिळवून दिल्याबद्दल यांच्या यशाबद्दल आनंद व्यक्त केला. याप्रसंगी बोलताना खोराटे म्हणाले की मालशे यांनी यापूर्वी भारतीय मूकबधिर क्रिकेट संघाचे कर्णधार म्हणून संघाला विजेतेपद मिळवून दिले आहे. मालशे यांच्या या सातत्यपूर्ण कामगिरी पिंपरी चिंचवड शहरासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. यातून मूकबधिर खेळाडूंना नक्कीच प्रेरणा मिळेल. 

      तसेच, पुढील वर्षी दुबई येथे होणाऱ्या मूकबधिर विश्वचषक स्पर्धेसाठी प्रशिक्षकपदासाठी देखील अतिरिक्त आयुक्त खोराटे मालशे यांना शुभेच्छा दिल्या.

     इंडीयन डेफ क्रिकेट असोसिएशन (आयडीसीए) च्या वतीने दि ३ नोव्हेंबर ते ९ नोव्हेंबर २०२५ या कालावधी दरम्यान ९ व्या टी-२० राष्ट्रीय मूकबधिर क्रिकेट चॅम्पियनशीप टुर्नामेंटचे नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली होती. सदर स्पर्धेमध्ये देशभरातील एकूण २० संघानी भाग घेतलेला होता. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र मूकबधिर क्रिकेट संघाचे प्रशिक्षक म्हणून पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मध्यवर्ती भांडार विभागाचे भांडारपाल विवेक मालशे यांची निवड करण्यात आली होती. 

     दिल्ली येथे पार पडत असलेल्या एकूण ७ दिवसांच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये अंतिम सामन्यात महाराष्ट्र डेफ क्रिकेट संघाने जम्मू काश्मीर डेफ क्रिकेट संघाचा ८ धावांनी पराभव करुन ९ व्या राष्ट्रीय टी-२० मूकबधिर क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. विवेक मालशे यांच्या तांत्रिक मार्गदर्शन, परिश्रम व संघभावनेच्या जोरावर महाराष्ट्र मूकबधिर क्रिकेट संघाने अंतिम सामन्यात विजय मिळविला. 

      प्रशिक्षक म्हणून महाराष्ट्र संघाला विजय मिळवून दिल्याबद्दल विवेक मालशे यांचा महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यासह अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर, सह आयुक्त मनोज लोणकर, क्रीडा विभागाचे उपायुक्त पंकज पाटील, सामान्य प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त अजिंक्य येळे तसेच विशेष अधिकारी किरण गायकवाड आदींनी अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments