
पिंपरी, दि. १३ नोव्हेंबर २०२५ :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने सहकारमहर्षी, पद्मभूषण माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या जयंतीनिमित्त सांगवी येथील त्यांच्या पुतळ्यास उप आयुक्त अण्णा बोदडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
सांगवी येथील झालेल्या कार्यक्रमास विशेष अधिकारी किरण गायकवाड,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक,प्रशासन अधिकारी राजू कांबळे,मुख्य आरोग्य निरीक्षक उध्दव ड्रीम,आरोग्य निरीक्षक स्नेहल सोनवणे,संदीप राठोड, सामाजिक कार्यकर्ते रविंद्र भोसले आणि नागरिक उपस्थित होते.
• वसंतदादा पाटील यांचे कार्य....
वसंतदादा पाटील हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, थोर समाजसेवक आणि प्रगल्भ नेते होते. त्यांनी आयुष्यभर शेतकऱ्यांच्या आणि सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी कार्य केले. स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय सहभाग घेतल्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश करून कृषी आणि ग्रामीण विकासाच्या माध्यमातून राज्याच्या प्रगतीसाठी योगदान दिले. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून कार्यरत राहिले असून, त्यांच्या कार्यकाळात सिंचन प्रकल्प, सहकार चळवळ, शिक्षण संस्था आणि औद्योगिक विकासावर त्यांनी विशेष भर दिला.

0 Comments