Hot Posts

6/recent/ticker-posts

सर्वसामान्‍य मराठा गोरगरिबांचा आधारवड म्‍हणजे - सतिश काळे

 

•चिंचवड विधानसभेतील सर्वसामान्‍य मतदारांच्‍या भावनिक प्रतिक्रिया.

        चिंचवड दि.१६-: पैशांअभावी रुग्णालयात उपचारासाठी रखडलेल्‍या रुग्णांच्‍या डोळ्यातील अश्रु पुसणे. सर्वसामान्‍य मराठा समाजातील बांधवांच्‍या आरक्षणाचा प्रश्‍न राजकीय पटलावर आणण्यासाठी रक्‍ताचे पाणी करेपर्यंत आंदोलन करणे. शहरातील घडत असलेल्‍या चुकीच्‍या प्रथांना आळा घालण्यासाठी अग्रभागी राहणे, ही व यासह अनेक स्‍वभाव गुण वैशिष्ट्ये पिंपरी चिंचवड संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष मराठवाड्याचे सुपुत्र सतिश काळे यांची आहेत. स्‍वराज्‍य राष्ट्रनिर्माण सेनेतून चिंचवड विधानसभा लढणारे, सर्वसामान्‍य मराठा, गोरगरिबांचा आधारवड म्‍हणजे सतीश काळे आहेत, अशा भावनिक प्रतिक्रिया चिंचवड मधील नागरिकांनी व्‍यक्‍त केल्‍या. 

        स्‍वराज्‍य राष्ट्रनिर्माण सेनेचे उमेदवार सतीश काळे चिंचवड विधानसभेत प्रचारानिमित्‍त नागरिकांशी संवाद साधत होते. या वेळी अनेक तरूण, ज्‍येष्ठ नागरिक, महिला त्‍यांच्‍या प्रति आपल्‍या भावना व्‍यक्‍त करत होत्‍या. तरूण वयापासूनच काळे यांनी समाजकारणाला सुरूवात केली. संभाजी ब्रिगेडच्‍या माध्यमातून त्‍यांची वैचारीक बैठक पक्‍की झाली. पुढे विचारवंत भेटत गेले. त्‍यामधून अधिक ज्ञानाची समृद्धी झाली. ज्ञानाला कृतीची जोड असावी म्‍हणून काळे यांनी आंदोलने, आमरण उपोषण, मोर्चे आयोजित करण्यावर भर दिला. सगळी यंत्रणा विरोधात असताना हेच मार्ग महत्‍त्‍वाचे वाटले. त्‍यांच्‍या कृतीने राजकीय लोकप्रतिनिधींना देखील दखल घेणे भाग पडते. 

        राज्‍यात गोरगरिब मराठा आरक्षणाअभावी पिछाडीवर पडत आहे. आर्थिक, सामाजिक प्रगती थांबत आहे. या समाजाला आरक्षण दिल्‍यास आर्थिकसह सामाजिक स्‍थर्ये प्राप्‍ती होईल. त्‍यासाठी अनेक मराठा आरक्षणासाठी झगडणाऱ्या आंदोलकांच्‍या खांद्याला खांदा लावून सतीश काळे देखील मैदानात उतरले आहेत. मराठा आरक्षणाचा प्रश्‍न शहरात आणि राज्‍यात चर्चेला येईल, असे काम करत आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात अनेक नागरिकांना आरोग्याच्‍या समस्‍या निर्माण होत आहेत. पैशाअभावी उपचार रखडत आहेत. उपचाराचा खर्च लाखो रुपयांनी कमी करून या नागरिकांच्‍या डोळ्यातील अश्रू पुसण्याचे काम काळे करत आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेतील अधिकाऱ्यांच्‍या मनमानीला आळा घालणे गरजेचे आहे. त्‍यासाठी महापालिका प्रवेशद्वारासमोर टीडीआर घोट्याळ्याविरोधात तीन महिने साखळी उपोषण छेडले. छत्रपती शिवाजी महाराज, शाहु महाराज, संभाजी महाराज, फुले-शाहु-आंबेडकर यांच्‍यासह महापुरूषांच्‍या विचारांचा प्रसार होण्यासाठी सतिश काळे काम करत आहेत, अशा भावना नागरिकांनी व्‍यक्‍त केल्‍या.यंदाच्‍या निवडणुकीत ते स्‍वराज्‍य राष्ट्रनिर्माण सेनेतून चिंचवड विधानसभा लढवत आहेत. त्‍यांना मोठा पाठिंबा देण्याचे आवाहन नागरिकांनी व्‍यक्‍त केले.

Post a Comment

0 Comments