
निगडी, दि. 09 एप्रिल 2026 — निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा. महेश बनसोडे साहेब यांच्या सहकार्याने लोकहितवादी सेवा संघ संस्थापक-अध्यक्ष मा. धर्मराज बनसोडे सर यांच्या वतीने निगडी पोलीस ठाणे येथे पोलिसांसाठी भव्य मोफत नेत्र (डोळे) तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिरात पोलिसांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. तसेच आवश्यक त्या उपचारांबाबत मार्गदर्शन देण्यात आले. या उपक्रमाला पोलिसांकडून उत्स्फूर्त व सकारात्मक प्रतिसाद मिळाला. या शिबिरासाठी ईशा नेत्रालयच्या ब्रांच मॅनेजर दुर्वाक्षी पाटील तसेच मेडिकल डायरेक्टर डॉ. वैभव अवताडे व यशवंत बोराडे सर यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच ऑप्टोमेट्रिस्ट वैष्णवी माने व अश्विनी दाभाडे यांनी तपासणीचे कार्य पार पाडले.
याशिवाय लोकहितवादी सेवा संघाचे पदाधिकारी निलेश कांबळे, लक्ष्मण शेलार, ऋषिकेश वाघमारे, आनंद सवतमाळ आदींनीही या उपक्रमासाठी मोलाचे सहकार्य केले. समाजहितासाठी अशा उपक्रमांची आज अत्यंत गरज असून, भविष्यातही अशा सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.


0 Comments