
इंदापूर (प्रतिनिधी गणेश धनवडे)-: इंदापूर तालुक्यातील निमसाखर गावामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन अति उत्साहात साजरा करण्यात आला संध्याकाळी पाच वाजता गावातून श्रींच्या पादुकांची ग्राम प्रदक्षिणा काढण्यात आली या पालखी सोहळ्यामध्ये सर्व महिला स्वामी भक्तांनी पालखी मार्गावर रांगोळी काढून अति उत्साहात स्वागत केले.
त्यानंतर श्रींच्या पादुकावर पुष्पवृष्टी करण्यात आली नंतर श्री राजाराम संभाजी जाधव यांचे तर्फे फटाकेंची आतषबाजी करण्यात आली त्यानंतर मंदिरामध्ये आरती व जप घेण्यात आला त्यानंतर श्री राजेंद्र हनुमंतराव रणवरे मुकादमवाडा यांच्यातर्फे महाप्रसाद देण्यात आला या कार्यक्रमासाठी आवर्जून वालचंद नगरचे स्वामीभक्त श्री राम कुंभार सर आवर्जून उपस्थित होते या सोहळ्याला निमसाखर गाव व परिसरातील सर्व स्वामी भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.


0 Comments