
पुणे; दि.१५ (शशिकांत पाटोळे) : वाई, महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन संचालनालय आणि हाय फ्लाय पॅराग्लायडिंग यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पांचगणी येथे ‘पॅराग्लायडिंग वर्ल्ड कप २०२६’चे आज उत्साहात उद्घाटन करण्यात आले. युरोपीय देशांमध्ये प्रामुख्याने आयोजित होणाऱ्या या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा मान यंदा प्रथमच भारतातील पांचगणीला मिळाल्याने सातारा जिल्ह्यासाठी ही अभिमानाची बाब ठरली आहे. जगातील सुमारे २५ देशांतील २०० नामांकित स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले असून स्पर्धेच्या परीक्षणासाठी Paragliding World Cup Association चे अध्यक्ष गोरान यांच्यासह जागतिक दर्जाचे तज्ञ पंच उपस्थित आहेत. कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार नितीन पाटील यांच्या हस्ते झाले
असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते आनंद चिरंगुटे, पांचगणी नगरपालिकेचे अध्यक्ष दिलीप बगाडे, दांडेघर गावच्या सरपंच सृष्टी खरात, माजी सरपंच शंकर कळंबे, नगरसेवक परवीन मेमन, नारायण बिरामणे, प्रकाश गोळे, सुप्रिया माने तसेच स्पर्धेच्या टेक्निकल टीममधील कृष्णकांत भागरा, श्री. दोहरा आदी मान्यवर उपस्थित होते. ही स्पर्धा १५ फेब्रुवारी ते २१ फेब्रुवारी दरम्यान पार पडणार असून पांचगणीकरांसह पर्यटकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. कार्यक्रमाचे स्वागत व आभार प्रदर्शन हाय फ्लाय पॅराग्लायडिंगचे चेअरमन अनुपम जाधव पाटील यांनी केले.

0 Comments