Hot Posts

6/recent/ticker-posts

“शिक्षक ते जिल्हा परिषद सदस्या : सौ. शितल कांबळे यांचा प्रेरणादायी प्रवास"

      पुणे (शशिकांत पाटोळे) | दिनांक ; २२ फेब्रुवारी २०२६ : *शिक्षक ते जिल्हा परिषद सदस्य- विद्यमान जिल्हा परिषद सदस्या सौ. शितल सुजित कांबळे (वाघ मैडम) यांनी केलेला संघर्ष आणी त्याला आलेले यश ही साधी आणी सोपी गोष्ट नाही. अखंडितपणे १२ वर्ष (एक तप) त्यांनी कात्रज मधिल पुष्पादेवी दुगड विद्यालयामध्ये शिक्षक म्हणून नोकरी केली.

      तेही प्रामाणिकपणे..या काळात जे हजारो विद्यार्थी त्यानी घडविण्याचे काम केले ती सुद्धा एक सेवाच होती.*''प्रामाणिक पणे कष्ट करा, यश नक्कीच मिळते”* या उक्ती प्रमाणे त्यांनी एक तप रोज २५ किलोमिटर चा प्रवास करुण आपली सेवा दिली. आज त्यांना त्यांच्या कष्टाचे फळ मिळाले त्या जिल्हा परिषद सदस्या झाल्या त्यामागे त्यांचे पती मा. ॲड. सुजित कांबळे व त्यांच्या कुटुंबीयांचा खंबीर पाठिंबा होता.

       निवडणुका लागायच्या आधीपासूनच त्यांनी जे सूक्ष्म नियोजन केले त्याला आज यश आले असे म्हणता येईल. ''प्रयत्नांती परमेश्वर" या उक्ती प्रमाणे त्यांनी आज प्रयत्न केलेच नसते तर…असो.. त्यांच्या या निवडीने आमच्या विद्यालयासाठी अभिमानाचा आणी आनंदाचा दिवस आला. आमच्यातिलच एक सहकारी आज एवढ्या मोठ्या पदावर,यशाच्या शिखरावर गेलेल पाहून अत्यानंद झाला.

       आज त्यानिमीत्ताने त्यांच्या व ॲड. सुजित सरांचा लोणी योथिल निवास्थानी जावुन त्यांना शाल,श्रीफळ आणी पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. प्रसंगी पुष्पादेवी दुगड विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. दिपक खैरे सर त्यांचे सहकारी शिक्षिका सौ. वंदना बांदल, सौ. रेखा निकम, प्रणल गायकवाड व एम.आय.टी.चे आप्पासाहेब लामकाने उपस्थित होते.

        सामान्य माणूस मोठ्या पदावर गेल्यावर वागण्यातील नम्रता, जमिनीशी नाळ आणि यशाचे श्रेय समाजाला देणे अपेक्षित असते आशा विचारांच्या मैडम.. भविष्यात सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे व लोणी काळभोर गटाचा विकास पारदर्शक व सर्वसमावेशक पणे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments