Hot Posts

6/recent/ticker-posts

बालगंधर्व रंगमंदिरात उद्या शोकसभा.


       पुणे; दि. १ (शशिकांत पाटोळे) :  राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे शिक्षण क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. प्रत्येकाच्या मनातील अजितदादा यांच्या विषयीची भावना व्यक्त करण्यासाठी जिल्ह्यातील शिक्षणसंस्थांची शोकसभा घेतली जाणार आहे.

       मंगळवारी (ता. ३ फेब्रुवारी) सकाळी साडेदहा वाजता बालगंधर्व रंगमंदिरात पुणे जिल्हा शिक्षण मंडळाने या शोकसभेचे आयोजन केले आहे. त्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू, उपकुलगुरू, शिक्षणतज्ञ जिल्ह्यातील वेगवेगळ्या शिक्षण संस्थांचे पदाधिकारी, संस्थाचालक, शिक्षक उपस्थित राहणार आहेत. या शोकसभेत अजितदादांनी शिक्षणक्षेत्रात केलेल्या कामगिरीचा, घेतलेल्या धडाकेबाज निर्णयांचा, अजितदादा यांच्या स्वभाववैशिष्ठ्यांच्या पैलूंना उजाळा मिळणार आहे. त्यामुळे या शोकसभेसाठी शिक्षणक्षेत्रातील सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments