
इंदापूर: प्रतिनिधी इंदापूर गणेश धनवडे.:-निमसाखर परिसरामध्ये ऊसतोड मजुरांची मोफत आरोग्य तपासणी शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित शंकरराव पाटील प्राथमिक आरोग्य केंद्र इंदापूर यांच्या संयुक्त विद्यमाने निरा भीमा सहकारी साखर कारखान्याच्या रेडणी गटातील निमसाखर गावाच्या परिसरातील 101 ऊसतोड मजुरांची मोफत आरोग्य तपासणी संपन्न.
संचालक श्री आनंदराव बोंद्रे म्हणाले शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा पद्माताई भोसले ,ट्रस्टचे सचिव डॉक्टर गिरीश देसाई सर, ट्रस्टचे खजिनदार तुषार रंजनकर सर,विश्वस्त अरविंद गारटकर सर यांनी ऊसतोड मजुरांसाठी मोफत आरोग्य तपासणी हा उपक्रम गेली सहा वर्षे झाली चालू केला आहे त्याचा लाभ ऊसतोड मजुरांना चांगला होतो आहे. प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या बांधावर जिथे ऊस तोड चालू आहे तेथे उसाच्या फडामध्ये येऊन मजुरांची आरोग्यसेवा आणि त्यांच्यावर औषध उपचार केले जातात त्यामुळे कारखान्याची ऊस तोडणी ला चांगली मदत होते आहे . या सेवेचा लाभ सर्व ऊसतोड मजुरांनी घ्यावा असे आव्हान त्यांनी केले. कोरोनासारखी महामारीच्या काळामध्ये फार मोठी सेवा ऊसतोड मुजरांसाठी ट्रस्टने दिली हे आम्ही विसरू शकत नाही.
इंदापूर अर्बन बँकेचे संचालक म्हणाले शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टचे कार्य महान आहे कारण ऊसतोड मजुर दुर्लक्षित घटकाकडे लक्ष देऊन त्यांची सेवा चांगल्या प्रतीची औषधे देऊन केली जाते आहे हे ट्रस्टचे कार्य महान आहे. आरोग्य तपासणी वेळी अनेक शेतकरी उपस्थित होते तसेच केंद्राच्या प्रमुख डॉक्टर्स सारंगी कुंभार मॅडम, नर्स , केंद्राचे प्रमुख महादेव चव्हाण सर आणि हनुमंतराव गोफणे उपस्थित होते या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आजची आरोग्य तपासणी संपन्न झाली. निमसाखर गावाच्या परिसरातील सर्व ऊसतोडणी टोळ्यांची तपासणी पूर्ण झाली.


0 Comments