Hot Posts

6/recent/ticker-posts

राशीन ता.कर्जत येथे पैशाचे व्यवहारातुन झालेल्या वादाचे कारणातुन झालेल्या खुनातील आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांची कारवाई.

 राशन कर्जत -: प्रस्तुत बातमीची हकीगत अशी की, दिनांक 28/10/2025 रोजी रात्री 21/00 वा. चे सुमारास कोर्टी व राशीन गावाचे शिवारात आरोपी नामे तेजस संजय काळे रा. कानगुडेवाडी ता. कर्जत जि. अहिल्यानगर व मयत चंद्रशेख रामदास जाधव यांचेमध्ये पैशाचे व्यवहाराचे वादाचे कारणावरुन मयत हा त्याच मित्र पृथ्वीराज साळुंके असे त्यांचे ताब्यातील  स्विप्ट गाडी क्रमांक एम.एच.16.डी.सी.8185 या कारने करमाळा रोडने जात असतांना आरोपीने त्याचे ताब्यातील स्विप्ट कार नंबर एम.एच.12.एन.जे.5720 या गाडीने मयताला जिवे ठार मारण्यासाठी त्यांचे गाडीला पाठलाग करुन त्यांचे गाडीला पाठीमागुन जोराची धडक देवुन मयतास गंभीर जखमी करुन जिवे ठार मारले आहे. व पृथ्वीराज सांळुंके यास जखमी केले आहे. सदर घटनेबाबत सुभाष शंकर जाधव वय-36 वर्षे रा. झरे ता. करमाळा जि. सोलापुर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन कर्जत पोलीस ठाणे गु.र.नं. 588/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 103(1), 118(1), 125(A), 125(B), 281, 324(4), मोटार वाहन कायदा कलम 134(A),(B), 177, 184 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

मा. श्री. सोमनाथ घार्गे साहेब, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांनी पोनि/श्री. किरणकुमार कबाडी, स्थानिक गुन्हे शाखा यांना सदर आरोपीतील आरोपी तात्काळ अटक करणे बाबत आदेशित केले आहे.

नमुद आदेशान्वये पो.नि. श्री किरणकुमार कबाडी यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार रमेश गांगर्डे, फुरकान शेख, भाऊसाहेब काळे, अमोल पोपट, बाळासाहेब खेडकर, मनोज साखरे, चालक अरुण मोरे अशांचे पथक नेमुन आरोपी तात्काळ अटक करणेबाबत सुचना देवुन पथकास रवाना केले. 

दिनांक 30/10/2025 रोजी पथकाने सदर गुन्ह्यातील पाहिजे आरोपी शोध घेत असतांना पथकास गुप्त बातमीदारामार्फत पाहिजे आरोपी तेजस संजय काळे रा. कानगुडेवाडी ता. कर्जत हा त्याचे पांढ-या रंगाच्या स्विप्ट गाडीमधुन अहिल्यानगर ते मिरजगांव रोडने चाललेला असल्याची माहिती मिळाली. पथकाने तात्काळ बनपिंप्री गावचे शिवारात रोडवर सापळा लावुन त्यास ताब्यात घेवुन त्यांना त्यांची नावे गांव विचारता त्यांनी त्यांची नावे. तेजस संजय काळे वय-19 वर्षे रा. कानगुडेवाडी ता. कर्जत, जि. अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले. आरोपीचे ताब्यात मिळुन आलेल्या चारचाडी गाडीबाबत विचारपुस करता त्यांनी सदरची गाडी गुन्हा करतेवेळी वापरलेली असल्याचे सांगितले आहे. आरोपीचे ताब्यातुन एकुण 5,30,00/- रुपये किमतीचे एक पांढ-या रंगाचा स्विप्ट गाडी, तीन वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल जप्त करण्यात आले आहे.

ताब्यातील आरोपी व जप्त मुद्देमाल कर्जत पोलीस ठाणे गु.र.नं. 588/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 103(1), 118(1), 125(A), 125(B), 281, 324(4), मोटार वाहन कायदा कलम 134(A),(B), 177, 184 प्रमाणे गुन्ह्याचे तपासकामी कर्जत पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असुन पुढील तपास कर्जत पोलीस स्टेशन करीत आहे. 

सदरची कारवाई श्री. सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

Post a Comment

0 Comments