पुणे जिल्हा प्रतिनिधी. कोणत्याही स्त्रीला नवऱ्यानंतर आधारांची गरज असते त्यामुळे ती कोणाचा तरी शोध घेत असते. मात्र आधार देणारा सुद्धा नवऱ्यासारखा असावा असे म्हणण्यात काही वावगे ठरणार नाही, मात्र प्रेमात पडलेला माणूस काही करू शकतो असं म्हणतात पण हे प्रेम दुसऱ्यासाठी जीवघेणं ठरेल, तर मग खूप पंचाईत निर्माण येते आणि त्यात दोघांचेही जीवन उध्वस्त होतं.
अशीच घटना पुणे जिल्ह्याच्या खेड राजगुरूनगर पोलीस ठाणेच्या हद्दीतून समोर आली आहे. पतीच्या निधनानंतर रूपालीची ललित बरोबर ओळख निर्माण झाली होती आणि या ओळखीचे रूपांतर अनैतिक संबंधात झाले, मात्र या दोघांच्या नात्यांमध्ये सतत वादावादी झाल्यामुळे प्रियकर ललित खोल्लम ने रागाच्या भरांमध्ये अखेर रूपालीचा रक्तरंजित केला. आणि घटनेनंतर तो फरार झाला, या गुन्ह्याची नोंद खेड राजगुरुनगर पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा म्हणून नोंद आहे. खेड राजगुरुनगरचे पोलीस आरोपी प्रियकरांचा शोध घेत आहेत.
याबाबत मिळालेल्या पोलीस सूत्रांकडून माहितीवरून रूपाली विलास वाडेकर (वय 46) मूळ रा. कल्याण जिल्हा ठाणे) हे ठाणे जिल्ह्यातील असून सध्या रूपाली ही काही दिवसांपासून खेड येथील आपल्या प्रियकर ललित च्या घरी वास्तव्यास होती. या दोघांमध्ये सततच्या वादावादीमुळे आरोपी प्रियकर ललित दीपक खोल्लम (वय 37) रा. शिंदेवस्ती शिरोली ता. खेड जि. पुणे) या प्रियकरांने रक्तरंजित केला. आणि घटनेनंतर आरोपी प्रियकर फरार झाला आहे. रूपाली आणि ललित चे अनैतिक संबंध होते पतीच्या निधनानंतर रूपालीनेच आधाराची गरज म्हणून प्रियकर शोधला होता, मात्र याच प्रियकरांकडून आपला शेवट होईल असं तिच्या मनातही वाटले नव्हते. मात्र पोलिसांनी सदर खूनच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने अनैतिक संबंधातून खून झाल्याचे प्राथमिक संशय बाळगला आहे. सदर गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण करीत आहेत.

0 Comments