Hot Posts

6/recent/ticker-posts

महानगरपालिकेच्या वतीने थोर स्वातंत्र्यसैनिक,क्रांतिवीर बिरसा मुंडा यांची जयंती उत्साहात साजरी...

      पिंपरी, दि. १५ नोव्हेंबर २०२५ :- स्वातंत्र्यपूर्व काळातील थोर क्रांतिकारक बिरसा मुंडा हे स्वातंत्र्यसैनिक, प्रखर देशभक्त आणि सामाजिक एकतेचा संदेश देणारे थोर समाजसुधारक देखील होते, त्यांच्या देशप्रेम,सामाजिक कार्य आणि विचारांतून भावी पिढीने प्रेरणा घ्यावी,त्यांच्या संघर्षाची परंपरा आपल्याला समाजहितासाठी कार्य करण्याची प्रेरणा देते तसेच जल व जंगल संवर्धनासाठी त्यांनी उभारलेल्या व्यापक चळवळीने समाजाला चालना मिळाली असे प्रतिपादन उप आयुक्त अण्णा बोदडे यांनी केले.

      थोर स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस उप आयुक्त अण्णा बोदडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. 

     या कार्यक्रमास माजी नगरसदस्या उषा मुंढे, आशा सुपे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, आदिवासी सांस्कृतिक मंडळाचे (पुणे) अध्यक्ष आनंद भवारी, डॉ, संतोष सुपे, अण्णा शेळके, विष्णू गवारी, बाळासाहेब सुपे, सतीश लेंभे, पांडुरंग तळपे, दत्तात्रय कोकाटे,गौरी गोणरे, संगीता दगडे तसेच महानगरपालिकेचे कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments