Hot Posts

6/recent/ticker-posts

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन....

 

        पिंपरी, दि. १४ नोव्हेंबर २०२५ : स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान,भारतरत्न पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे त्यांना अभिवादन करण्यात आले. महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या हस्ते पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीतील पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

        यावेळी महापालिकेचे माजी नगरसदस्य मारुती भापकर,अनुराधा गोरखे, नगरसचिव मुकेश कोळप, उपायुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक,  सामाजिक कार्यकर्ते संजय ससाणे, नाना कांबळे, गणेश करवले, युवराज दाखले, नितीन घोलप, बाबासाहेब रसाळ, अनिल सौंदडे, हेमंत हरहरे, सूरज कांबळे उपस्थित होते.

…..

• नेहरूनगर येथील पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुतळ्यास अभिवादन....

      पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने नेहरूनगर येथील पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुतळ्यास उपायुक्त अण्णा बोदडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी नगरसदस्य राहुल भोसले महापालिकेचे  विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक,  यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते संजय गाडगीळ,अनिल यादव, चंद्रकांत पवार, एम.पी. चव्हाण, सुभाष टाकळे, मुख्याध्यापक शेख आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments