कार्यक्रमात बोलताना डॉ. तरंगे म्हणाले,
“राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सामान्य माणसाला नेतृत्वाची संधी देणारा पक्ष आहे. माझी फेरनियुक्ती ही पक्षाने माझ्यावर दाखविलेल्या विश्वासाची पावती आहे. कार्यकर्त्यांच्या हितासाठी आणि पक्षविस्तारासाठी अधिक जोमाने काम करणार आहे.”
तसेच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित दादा पवार, राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, तसेच तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार मानले.
राज्यात सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्वाधिक जागा जिंकणार असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सत्कार कार्यक्रमाच्या आयोजनामुळे संपूर्ण गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. या वेळी एकनाथ पारेकर, दीपक पाटील, तुकाराम पारेकर, दादा पारेकर, स्वप्निल पारेकर, किरण पारेकर, विष्णू पारेकर, हनुमंत पारेकर, देविदास पारेकर, गणेश देवकाते, ईश्वर पारेकर, कमलाकर पारेकर, अजित पारेकर, सागर पारेकर, करण मारकड अविनाश पारेकर, अशोक देवकाते, जतीन लोखंडे,यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
डॉ. तरंगे यांच्या उपस्थितीमुळे गावात स्नेह, एकात्मता आणि पक्षनिष्ठेचे दर्शन घडल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
कार्यक्रमाची सांगता राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजी आणि डॉ. तरंगे यांच्या पुढील राजकीय वाटचालीस दिलेल्या शुभेच्छांनी झाली.


0 Comments