Hot Posts

6/recent/ticker-posts

वरुडे पाटील उत्कृष्टता आंतरराष्ट्रीय पुरस्कार -शशिकांत पाटोळे

 

      पुणे : सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे माय माऊली केअर सेंटरचे संस्थापक अध्यक्ष व लायन्स क्लब कात्रजचे संस्थापक लायन विठ्ठलराव वरुडे पाटील या कर्मयोगींचा लायन्स आंतरराष्ट्रीय डिस्ट्रिक्ट 3234- डी 2 यांच्या वतीने पुणे येथील हॉटेल शेरेटन ग्रँड येथे भव्य अशा सोहळ्यात सन्मानित करण्यात आले. 

        या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती बॉलीवूड सुपरस्टार अभिनेत्री संगीता बिजलानी, डिस्ट्रिक्टचे प्रांतपाल एम जे एफ ला.राजेशजी अग्रवाल, यांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती उद्योगपती कोहिनूर ग्रुप मा.कृष्णकुमारजी गोयल, ला फत्तेचेंनजी रांका, ला.राजेश बंसल, व्हॉइस प्रांतपाल ला.राजेंद्रजी गोयल,लायन्स मेंबर्स, आदी मान्यवत्यांच्या उपस्थितीमध्ये पुरस्कार प्रदान करण्यात आला.

       यावेळी सर्वच मान्यवरांनी वरुडे पाटील यांच्या कार्याचे कौतुक करताना सांगितले की अशा समाजसेवकांची समाजाला गरज असून कोणत्याही क्षेत्रात ते अत्यंत सचोटीने तत्परतेने आणि सातत्याने काम करत असतात तसेच त्यांच्या कार्यात विश्वासाहर्ता असल्याने सर्व सामान्य गरजूसाठी ही बाब फायदेमंद असून त्यांच्या कार्याची प्रेरणा सर्वांनी घ्यावी.


     सत्काराला उत्तर देताना वरुडे पाटील यांनी सांगितले की अशा प्रकारच्या सन्मानामुळे सामाजिक क्षेत्रात सेवा करण्यासाठी प्रेरणा व बळ मिळत असते, तसेच यामुळे सामाजिक जबाबदारी व उत्साह देखील वाढला आहे यापुढे सामाजिक क्षेत्रात जास्तीत जास्त सचोटीने काम करण्याचा प्रयत्न राहील हा सन्मान ज्येष्ठ व वृद्ध च्या सेवेमुळे मिळाल्याने हा पुरस्कार त्यांना समर्पित करत आहे. हा सन्मान दिल्याबद्दल आयोजकांचे धन्यवाद देत आभार मानले.

Post a Comment

0 Comments