मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाची उल्लेखनीय कामगिरी
सराईत गुन्हेगाराकडुन अवैधरित्या विक्रीसाठी आणलेले ०२ देशी बनावटीचे पिस्टल व ०२ जिवंत काडतुसे जप्त
श्री विनयकुमार चौबे, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड यांनी आढावा बैठकीमध्ये गुन्हे शाखेतील अधिकारी व
अंमलदार यांना पिंपरी चिंचवड आयुक्तालय हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती काढुन अवैध अग्नीशस्त्र वापरणारे
गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाई करणेबाबत आदेश दिले होते. त्याप्रमाणे गुन्हे शाखेतील मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे
वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांनी पथकातील अधिकारी व अंमलदार यांना मार्गदर्शन करुन आयुक्तालय हद्दीतील
अवैध अग्नीशस्त्रे बाळगणाऱ्या गुन्हेगारांची माहिती काढुन त्यांवर देखरेख ठेवण्याच्या सुचना दिल्या होत्या.
मालमत्ता गुन्हे विरोधी पथकातील सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुळीग, पोलीस अंमलदार गणेश सांवत,
विनोद वीर, सुमित देवकर, हर्षद कदम असे पथक एम.आय.डी.सी. भोसरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पेट्रोलींग करीत
| असताना त्यांना चाकण पोलीस स्टेशन हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार नामे सुरज राजु गिराम उर्फ डोंगरे, वय २० वर्षे, रा
| मेदनकरवाडी, मार्तंडनगर, चाकण, पुणे हा आर.टी.ओ. रोड, मोशी प्राधिकरण, पुणे येथे गावठी पिस्टल विक्री करणेकरीता
येणार आहे अशी बातमी प्राप्त झाली. त्याअनुशंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांचे मार्गदर्शनाखाली नमुद
पथकाने नमुद रेकॉर्डवरील आरोपीस ताब्यात घेवुन त्याचेकडुन १,०२,००० रु. किं.चे. ०२ देशी बनावटीचे पिस्टल व ०२
जिवंत काडतुसे हस्तगत केली आहे. नमुद पथकाने त्याचे विरुध्द एम. आय. डी. सी. भोसरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर
नंबर ४४० / २०२५ अन्वये भारतीय हत्यार कायदा कलम ३,२५ व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) १३५ प्रमाणे गुन्हा
नोंद केला असुन त्याचा पुढील तपास मालमत्ता गुन्हे विरोधी पथक हे करीत आहे. नमुद आरोपी सुरज राजु गिराम उर्फ
डोंगर याचेविरुध्द यापुर्वी चाकण पोलीस स्टेशन येथे अवैध शस्त्र बाळगणेबाबत गुन्हा नोंद आहे.
मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विजय ढमाळ यांचे मार्गदर्शनाखाली नमुद पथकाने सन
२०२५ मध्ये ०७ महिन्यामध्ये आतापर्यंत १६ देशी बनावटीचे पिस्टल व ४२ जिवंत काडतुसे जप्त केले आहे.
सदर उल्लेखनीय कामगिरी ही पिंपरी चिंचवड चे मा. पोलीस आयुक्त श्री. विनयकुमार चौबे साो. सह पोलीस
आयुक्त, मा. श्री. शशिकांत महावरकर साो, अपर पोलीस आयुक्त, श्री सारंग आवाड साो, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, मा.
डॉ. शिवाजी पवार, सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे १, डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता गुन्हे विरोधी
पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, सहायक पोलीस निरीक्षक दतात्रय गुळीग, पांडुरंग देवकाते, पोलीस
अंमलदार गणेश सांवत, हर्षद कदम, सुमित देवकर, विनोद वीर, प्रविण कांबळे, गणेश हिंगे, सोमनाथ मोरे यांनी केली आहे.

0 Comments