निगडी, पिंपरी चिंचवड – निगडी परिसरातील अंकुश चौक येथील वाहतूक सिग्नल गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहे. वारंवार तक्रार देऊनही पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि वाहतूक विभाग याकडे दुर्लक्ष करत आहेत. या रस्त्याने लहान मुले शाळेत जातात, कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात प्रवास करतो. त्यामुळे नागरिकांना रस्ता पार करताना जीव मुठीत घेऊन चालावे लागते.
यासोबतच काही अन्न विक्रेत्यांमुळे रस्त्यावर गर्दी होते, वाहतुकीचा अडथळा निर्माण होतो, त्यावर देखील योग्य ती कार्यवाही व्हावी.
📌 आमची मागणी:
1. अंकुश चौकातील वाहतूक सिग्नल तात्काळ सुरू करण्यात यावा.
2. चिकन चौक व अंकुश चौक येथे वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्यात यावी.
3. आरटीओ विभागाने याठिकाणी नियम पाळले जात आहेत का याची पाहणी करावी.
4. अडथळा निर्माण करणाऱ्या स्टॉल्सवर कार्यवाही करावी.
जर प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष दिले नाही, तर नागरिकांच्या जीवाला धोका होऊ शकतो. म्हणून आम्ही जबाबदार अधिकाऱ्यांकडे विनंती करतो की तात्काळ पावले उचलावीत व नागरिकांचे जीवन सुरक्षित करावे.
– सुनिल कांबळे
सचिव, सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट)
पिंपरी चिंचवड शहर



0 Comments