• पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट - ३ ची कामगिरी
चाकण -: दि 03/06/2025 रोजी चाकण पोलीस स्टेशन हद्दीत चाकण शिक्रापूर रोड विशाल गार्डन सोसायटी जवळ
असणारे समर्थ किराणा स्टोअर्स येथे सकाळी ०८.३० वा. सुमारास समर्थ किराण स्टोअर्स च्या मालकीण महिला
फिर्यादी नामे सुमन काशिनाथ शिंदे वय ६५ वर्षे रा चारभुजा सोसायटी चक्रेश्वर रोड चाकण ता. खेड जि. पुणे या
दुकानात एकटया बसलेल्या असताना चॉकलेट व बडीशेप खरेदी करण्याच्या बहाण्याने अनोळखी इसमाने सदर
महिलेच्या गळयातील मंगळसुत्र, पॅडॉल, व चैन बळजबरीने खेचून त्याचेकडील मोटरसायकल वरून तो चाकण दिशेने
पसार झालेला होता. सदर महीलेच्या तक्रारीवरुन चाकण पो. स्टे. गु.र.नं. ३६४ / २०२५भा. न्या. संहीता कलम ३०९ (४)
प्रमाणे गुन्हा दाखल झालेला होता.
सदर गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने आमचे मार्गदर्शनाखाली सदर गुन्हयाचे समांतर तपासकामी गुन्हे शाखा
युनिट ३ कडील पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम व स्टाफ यांनी घटनास्थळी भेट देवून घटनास्थळाचे आजुबाजुचे
सीसीटीव्हीची तपासणी करुन २० किमी अंतरापर्यत सीसीटीव्ही तपासुन आरोपी नामे यशवंत दिगंबर सूर्यवंशी वय ३२
वर्षे रा सध्या बोरजाईनगर चाकण ता. खेड जि. पुणे यास बोरदरा गावचे हद्दीत संधार कंपनीजवळ ता खेड जि. पुणे
येथून शिताफिने ताब्यात घेवून त्यांचेकडे सखोल चौकशी केली असता सदर आरोपीने गुन्हा केलेचे कबुल केले आहे.
त्याच्या अंगझडतीत गुन्हयामध्ये चोरीस गेलेला मुददेमाल सोन्याचे दागिणे २२ ग्रॅम वजनाचे किंमती रुपये १,८०,०००/-
व गुन्हयात वापरलेली पॅशन प्रो मोटर सायकल नंबर MH 14 HE 2493 त्याचेकडुन जप्त करण्यात आलेली आहे.
सदरचा गुन्हा घडले पासुन अवघ्या ६ तासाच्या आत मध्ये गुन्हे शाखा युनिट ३ पिंपरी चिंचवड आयुक्तालय
यांनी हि कामगिरी केली आहे.
सदरची कारवाई ही मा. पोलीस आयुक्त, श्री. विनय कुमार चौबे, मा. अपर पोलीस आयुक्त श्री. सारंग
आव्हाड, मा.पोलीस उप आयुक्त (गुन्हे) संदिप डोईफोडे, सहा पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. विशाल हिरे यांचे
मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, पोलीस उपनिरीक्षक सुनिल जावळे, पोहवा / १४५६ भोसुरे,
पोहवा/७५५ आढारी, पोशि/ २७१८ सुर्यवंशी, पोशि/ २२७३ दांगट, पोशि/२८८३ काळे, पोशि/ २३९९ बाळसराफ यांनी
केली आहे.

0 Comments