Hot Posts

6/recent/ticker-posts

मांजरी, हडपसर परिसरात दहशत माजवणारे आरोपी जेरबंद

 


      हडपसर-:  पोलीस स्टेशन, पुणे शहर दिनांक २९/०५/२०२५ रोजी गार्गी एंटरप्रायजेसचे समोर मांजरी बुद्रुक, पुणे येथे सुमित उर्फ विलास खवळे, वैभव गवळी इतर अनोळखी चार मुलांनी बेकायदेशीर जमाव जमवुन तसेच बेकायदेशीर लोखंडी हत्यार व पिस्टल जवळ बाळगुन सुमित उर्फ विलास खवळे याने फिर्यादी यांचे मुलाच्या दिशेने बंदुकीतुन गोळी झाडुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला तसेच वैभव गवळी हा लोखंडी हत्यार घेवून जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने फिर्यादी यांचे मुलाच्या मागे लागला होता. त्याबाबत हडपसर पोलीस स्टेशन गु.र.नं ५०९/२०२५, भा.न्या.सं.का.क.१०९,१८९(२), (४),१९०,१९१(२) (३) आर्म अॅक्ट कलम ३ (२५) ४ (२५), क्रिमीनल लॉ अमेंडमेंट का. कलम ७, म. पो. अधि. कलम ३७ (१) (३) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

      दाखल गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून हडपसर पोलीस स्टेशनची दोन पथके तयार करुन तपास करण्यात आला. सदर पथकांच्या तपासात मिळालेल्या माहीती नुसार १) सुमित उर्फ विलास दत्ता खवळे वय २० वर्ष रा. बैंक ऑफ बडोदाच्यामागे, सासवड रोड, सातववाडी, हडपसर, पुणे, २) साहिल बाबुराव जगताप वय २० वर्ष रा. जाईमंगल कार्यालयाच्यासमोर, अशोका बारच्यामागे, धवाटे वस्ती, मांजरी, पुणे, ३) बसवराज विजय सुतार, वय २४ वर्ष केशवनगर ग्रामपंचायतजवळ, पोटे कम्पुटरजवळ, मुंढवा, पुणे ४) वैभव श्रवण गवळी वय २२ वर्ष रा केशवनगर मुढवा पुणे यांना तात्काळ ताब्यात घेण्यात आले. त्यांचेकडे केले तपासात त्यांनी दाखल गुन्हा केल्याचे सांगून गुन्ह्याकरीता लागणारे अग्निशस्त्र हे शिरूर येथील इसमाकडून घेतले असल्याचे सांगीतल्याने तपास पथकाने शिरूर भागात जावून ५) सचिन गंगाराम रेनके वय ३५ वर्ष रा. गादीया पेट्रोलपंपाच्यामागे, इंदीरा नगर शिरूर यास ताब्यात घेतले. आरोपींकडून त्यांनी गुन्हा करताना वापर केलेले गावठी बनावटीचे पिस्टल हे हस्तगत करण्यात आले आहेत.

      सदरची कामगिरी ही मा. अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप आयुक्त साो., परिमंडळ ५ पुणे शहर डॉ. राजकुमार शिंदे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे शहर श्रीमती अनुराधा उदमले यांचे मागदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर श्री. संजय मोगले, पोलीस निरीक्षक (गुन्हे) निलेश जगदाळे यांचे सुचनांप्रमाणे तपास पथकाचे पोलीस अधिकारी पोलीस उप-निरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गेंड, पोलीस अंमलदार अविनाश गोसावी, दिपक कांबळे, अमित साखरे, निलेश किरवे, बापु लोणकर, अमोल दणके, अजित मदने, अभिजीत राऊत, तुकाराम झुंजार, महेश चव्हाण, कुंडलीक केसकर, चंद्रकांत रेजितवाड, महाविर लोंढे, लखन दांडगे, सागर कुंभार यांचे पथकाने केली आहे.

Post a Comment

0 Comments