दिल्ली -: India vs Pakistan Tension : भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण भारताने ऑपरेशन सिंदूर राबवल्यानंतर गुरूवारी रात्री पाकिस्तानने भारतातील जम्मू काश्मीर,पंजाब, राजस्थान आणि गुजरात या राज्यावर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ले केले होते. पाकिस्तानचे हे हल्ले भारताने चांगलेच परतवून लावले होते. यामध्ये नागपूरच्या सायलेंट किलरने मोलाची भूमिका बजावली होती.त्यामुळे सायलेंट किलर नेमका कोण आहे? हे जाणून घेऊयात.
पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर ही मोहिम राबवत पाकिस्तानातील दहशतवादी स्थळ उद्ध्वस्त केली होती.त्यानंतर पाकिस्तान पुन्हा भारतावर हल्ला करेल, याची आधीच भारताला कल्पना होती. त्यामुळे प्रत्येक राज्याच्या सीमाभागात भारताने पाकिस्तानला प्रतिउत्तर देण्यासाठी शस्त्रसाठा ठेवला होता. यामध्ये नागपूरच्या सोलार निर्मित नागास्त्राचा वापर करण्यात आला होता.या नागास्त्राने पाकिस्तानचे ड्रोन हल्ले परतवून लावले होते.


0 Comments