• युनिट ०२ गुन्हे शाखा, पुणे
कोथरूड पुणे-: दिनांक १९/०५/२०२५ रोजी गुन्हे शाखा युनिट ०२ कडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार गस्त करीत असताना, पोलीस अंमलदार उज्वल मोकाशी व शंकर कुंभार यांना मिळालेल्या गोपनिय माहितीच्या अनुषंगाने गुंड शरद मोहोळ याच्या खुनाचा बदला घेणेस प्रत्युत्तर देणेकामी कट रचलेबाबत खराडी पोलीस स्टेशन येथे दाखल असलेला गुन्हा रजिस्टर क्रमांक ०३/२०२५ बी.एन.एस. १११, ६१ (ब) आर्म अॅक्ट ३ (२५) मधील रेकार्डवरील पाहिजे असलेला रेकार्डवरील आरोपी नामे ओंकार सचिन मोरे वय २३ वर्ष रा. मुठा कॉलनी पुणे यास चारनळ सुतारदरा कोथरुड पुणे येथून ४०,८००/- रु.किमंतीचे १ गावठी बनावटीचे पिस्टल व ०२ जिवंत काडतूसासंह ताब्यात घेवून कोथरुड पोलीस स्टेशन पुणे येथे गुन्हा रजि.क्रमांक १३५/२०२५ आर्म अॅक्ट ३ (२५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री. अमितेशकुमार, मा. सह पोलीस आयुक्त श्री. रंजनकुमार शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) अतिरीक्त कार्यभार श्री. मनोज पाटील, मा.पोलीस उप-आयुक्त गुन्हे, श्री. निखिल पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त गुन्हे-१ श्री. गणेश इंगळे यांचे मागदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट २ कडील पोलीस निरीक्षक श्री. प्रताप मानकर, सपोनि आशिष कवठेकर, सपोनि अमोल रसाळ, पोउपनि नितीन कांबळे, पोलीस अंमलदार उज्वल मोकाशी, शंकर कुंभार, संजय जाधव, शंकर नेवसे, विजयकुमार पवार, नागनाथ राख, ओमकार कुंभार, हनुमंत काबंळे, अमोल सरडे, विनोद चव्हाण, गणेश थोरात, निखिल जाधव, साधना ताम्हाणे, पुष्पेंद्र चव्हाण व नागेश राख यांनी केली आहे.

0 Comments