Hot Posts

6/recent/ticker-posts

एरंडोल येथे तिरंगा रॅलीतून भारतीय जवानांच्या शौर्याला एरंडोलकरांचा सॅल्युट…

 


       कासोदा प्रतिनिधी – ऑपरेशन सिंदूर ‘ च्या अंतर्गत दहशतवाद्यांना अद्दल घडवणाची शौर्याची कामगिरी केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी येथे १९ मे २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता तिरंगा रॅली उत्साहपूर्ण वातावरणात काढण्यात आली.या तिरंगा रॅलीत माजी सैनिक,अग्निवीर,वीरमाता,वीरपत्नी, सैनिक,माता भगिनी, युवक, युवती, राजकीय क्षेत्रातील नेते, पदाधिकारी,कार्यकर्ते व देशप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.या तिरंगा यात्रेची सुरुवात श्रीराममंदीरापासून होऊन शहरातील विविध मार्गांनी तिरंगा यात्रा नेण्यात आली व डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ सांगता झाली.यावेळी मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा फुले यांच्या पुतळ्यांस पुष्पहार अर्पण करण्यात आला.

     सदर तिरंगा यात्रा परदेशी गल्ली, मारवाडी गल्ली,भगवा चौक,मेनरोड,माळी वाडा, नागोबा मढी या मार्गाने जाऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ तिरंगा यात्रेचा समारोप करण्यात आला.रॅलीमध्ये विविध घोषणा देण्यात आल्या.

      या तिरंगा यात्रेत खासदार स्मिताताई वाघ,भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ.राधेश्याम चौधरी, भगवान आसाराम महाजन,माजी नगराध्यक्ष रमेशसिंग परदेशी,दशरथ महाजन, राजेंद्र चौधरी, अशोक चौधरी,योगेश महाजन,किशोर निंबाळकर, रविंद्र महाजन,जगदीश ठाकूर, शालिग्राम गायकवाड,भिका कोळी,अजित पाटील,नाना महाजन, सुनील पाटील,निलेश परदेशी, सचिन विसपुते, ॲड.नितीन महाजन, ॲड.जगन्नाथ पाटील,रामभाऊ गांगुर्डे,माजी सैनिक कृष्णा महाजन,डॉ.प्रशांत पाटील,ऋषिकेश पाटील,लखन ठाकूर, दिलीप पांडे आदींची उपस्थिती होती.संदीप पाटील यांनी प्रास्ताविक केले.

Post a Comment

0 Comments