Hot Posts

6/recent/ticker-posts

राजगुरुनगर येथील "तिरंगा यात्रेत" ऑपरेशन सिंदूर मध्ये लढलेल्या स्थानिक वीर जवानावरती अभिनंदनाचा वर्षाव -शशिकांत पाटोळे

 

       राजगुरुनगर : समस्त पाटोळे वडगावकरांसाठी सार्थ अभिमान.. ऑपरेशन सिंदूरचा व त्यात आपल्या जीवाची बाजी लावून लढलेल्या भूमिपुत्राच्या यशाचा गौरव तसेच राजगुरुनगर करांचा तिरंग्याला सलाम..

      काल पार पडलेल्या तिरंगा यात्रेमध्ये हजारो राष्ट्रप्रेमी, देशभक्त राजगुरूनगरकरांनी उस्फूर्त सहभाग घेतला होता


         पंचायत समिती राजगुरुनगर महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन करून त्यांच्या पुतळ्यापासून तिरंगा यात्रेस प्रारंभ झाला. "ये जवान तुझे सलाम" "वंदे मातरम" व "भारत माता की जय" या देशभक्तीच्या घोषणांनी आसमंत भारावून गेला. व या यात्रेचा शेवट आद्य क्रांतिवीर भूमिपुत्र हुतात्मा राजगुरूंच्या जन्मस्थळ असलेल्या वाड्यात वीर जवानांना श्रद्धांजली वाहून तसेच राष्ट्रगान म्हणून या तिरंगा यात्रेचा शेवट करण्यात आला.

   ही यात्रा केवळ ऑपरेशन सिंदूर मध्ये  वीरगती प्राप्त झालेल्या जवानांना श्रद्धांजली नव्हे तर आपल्या वीर जवानांच्या शौर्याला दिलेला मानाचा मुजरा होता.

       वडगाव पाटोळे राजगुरुनगरचे जिगरबाज, निर्भीड फौजी श्री. सचिन चव्हाण हे गेल्या काही महिनाभरापासून युद्धजन्य परिस्थिती मध्ये काश्मीर मधील पुलवामा येथे अहोरात्र ड्युटीवर आहे... गेल्या ८ दिवसापूर्वी त्यांनी व त्यांच्या टीम ने काश्मीर खोऱ्यातील एका घरात लपून बसलेल्या ३ दहशतवादयांचा खात्मा केला व  कालच पुलवामा येथे एका सर्च ऑपरेशन मध्ये पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यातील कुख्यात दहशतवादी व त्याचे साथीदार असे मिळून ३ जणांचा जागीच खात्मा केला आहे. त्यांची कामगिरी खरोखरच कौतुकास्पद आहे. या दहशतवाद्यावर केंद्र सरकारने ४० लाख रुपये इनाम ठेवला होता. या कारवाई मध्ये सचिन चव्हाणच्या टीम मधील २ जवानांना गोळी लागली असताना देखील जीवाची पर्वा न करता त्यांनी ही शूर कामगिरी पार पाडली. पाटोळे वडगावकर ग्रामस्थ व राजगुरुनगर येथील आपल्या या शूर वाघावर, सुपुत्रावर तसेच  त्याच्या टीमवर पंचक्रोशीतील सर्व राष्ट्र प्रेमी नागरिकांकडून काढलेल्या तिरंगा यात्रेत अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला. त्यांच्या कार्यास सलाम व त्यांच्याबद्दल सार्थ अभिमान असल्याच्या भावना व्यक्त करण्यात आल्या....


Post a Comment

0 Comments