Hot Posts

6/recent/ticker-posts

छत्रपती संभाजी महाराज म्‍हणजे स्‍वराज्‍यासाठी प्राणपणाने लढणारे शाक्तवीर : आबासाहेब ढवळे

 

      • संभाजी ब्रिगेडच्‍या वतीने छत्रपती संभाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी

       पिंपरी चिंचवड दि.१४-:  स्वराज्य टिकवण्यासाठी वाढवण्यासाठी अंतर्गत कलहाशी व शत्रूशी समर्थपणे व प्राणपणाने लढणारे शाक्तवीर म्‍हणजे छत्रपती संभाजी महाराज आहेत. त्‍यांच्‍या बलिदानातून स्‍वाभिमानी धगधगत्‍या निखाऱ्यासारखा स्‍वराज्याचा इतिहास रचला गेला असे प्रतिपादन मराठा सेवा संघाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष आबासाहेब ढवळे यांनी केले.


        चिंचवड शाहूनगर बर्ड व्हॅली येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकास संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष गणेश दहिभाते यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी आबासाहेब ढवळे बोलत होते. यावेळी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक इंजि. मनोजकुमार गायकवाड संभाजी ब्रिगेडचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सतिश काळे, प्रविण कदम,जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण शहर कार्याध्यक्ष दिनेश मराठे,सचिव विशाल मिठे,संघटक सिद्धार्थ भोसले, सहसचिव जगदीश दुधभाते उपाध्यक्ष नारायण बिराजदार,सहसंघटक तेजस गवई,जिजाऊ ब्रिगेडच्या शहराध्यक्ष शुभांगी यादव,कार्याध्यक्षा वृषाली साठे, शाम पाटील,संजय भागींदरे यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

     

      आबासाहेब ढवळे म्‍हणाले की, संभाजीराजे संकटांवर केवळ स्वार झाले नाहीत; तर त्यांनी सर्व आक्रमकांच्या उरात धडकी भरवली स्वराज्याचा निम्म्या भारतात विस्तार केला केवळ ९ वर्षांच्या काळात एकही पराभव तह वा माघार नसलेल्या १२८ लढाया त्यांनी जिंकून आपल्या पित्याच्या नावाला खूप मोठा सन्मान प्राप्त करून दिला त्‍या छत्रपती संभाजी महाराजांचा आपल्याला वारसा आहे हे भाग्याचे आहे.


Post a Comment

0 Comments