मुंबई : पाकिस्तानाने एकापाठोपाठ भारतावर हल्ले करून शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे. गुरुवारी रात्री पाकिस्तानी सैन्याने भारतातील ३ राज्यामध्ये घुसून ड्रोन हल्ले केले आहे. दिवसभरात पाकिस्तानने २ मोठे हल्ले केले आहे. पाकिस्तानच्या या भ्याड हल्ल्याची अमेरिकेनं दखल घेतली आहे. भारतावर हल्ले लगेच थांबवा, तुम्ही लगेच माघार घ्या, अशा शब्दांत अमेरिकेनं पाकिस्तानला खडसावलं.
सुरक्षा स्थितीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची बातमी समोर येते आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हल्ल्याच्या सविस्तर माहितीची कल्पना दिली आहे. पंतप्रधान मोदी स्वतः या संपूर्ण घडामोडींवर सतत लक्ष ठेवून आहेत आणि संबंधित यंत्रणांशी थेट संपर्कात आहेत.
पाकिस्तानी सैन्याने एकाच वेळी भारताच्या वेगळ्या ठिकाणी अचानक ड्रोन हल्ला केला आहे. सीमारेषेजवळ भ्याड हल्ले केले आहे. सीमारेषेजवळ असलेल्या जम्मू, राजस्थान आणि पंजाबच्या सीमेजवळ पाकिस्तानने ड्रोन हल्ला केला आहे. पंजाबच्या अमृतसरमध्ये ड्रोन हल्ले केले आहे. पण भारतीय सैन्याने कडक प्रत्युत्तर दिलं आहे. पाकिस्तानचा भ्याड हल्ला जवानांनी परतून लावला आहे. पण पहिल्यांदाच पाकिस्तानी सैन्याचं ४ राज्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी हल्ले केले आहे. या हल्ल्याचं आता भारत कसं प्रत्युत्तर देणार हे पाहण्याचं ठरणार आहे.


0 Comments