पिंपरी चिंचवड-: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अखत्यारीतील निगडी सेक्टर २२ येथील रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट झाली असून, दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण वाढत आहे. या भागात राहणाऱ्या नागरिकांचे जीवन धोक्यात आले असून, महानगरपालिकेचे याकडे सर्रास दुर्लक्ष सुरू आहे.
या भागात डांबरीकरणाचे काम मंजूर असूनही प्रत्यक्षात काहीच काम झालेले नाही. निधी कुठे गेला? ठेकेदार कोणाला पैसे देतात? आणि स्लम भाग असल्यामुळे गरीब नागरिकांचे प्रश्न दुर्लक्षित केले जात आहेत का? असा सवाल नागरिक विचारत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) यासंदर्भात तीव्र नाराजी व्यक्त करत आहे आणि आयुक्त श्री. शेखर सिंह यांच्याकडे याची तातडीने चौकशी करण्याची मागणी करीत आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी आणि सेक्टर २२ मधील रस्त्यांचे काम तात्काळ सुरू करण्यात यावे, अशी आमची स्पष्ट मागणी आहे.
हा भाग गरीब व श्रमिक वर्गाचा असून, जर फक्त मतं घेण्यासाठीच त्यांच्या दारात येणार असाल, आणि त्यांचे जीवन सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासन मौन बाळगणार असेल, तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा देत आहोत.


0 Comments