: पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयोजित विशेष कार्यक्रमात सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे यांचे प्रतिपादन...
पिंपरी, ११ एप्रिल २०२५:- पिंपरी चिंचवड शहरातील तृतीयपंथीय समाजाला मुख्य प्रवाहात आणणे, त्यांच्या कार्याची दखल घेणे, आवश्यक सोईसुविधा देऊन सहकार्याची भावना दृढ करणे आणि त्यांच्या सक्षमीकरणासाठी प्रशासन आणि समाज एकत्र येणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे यांनी केले.
या कार्यक्रमास विशेष अधिकारी किरण गायकवाड,सहाय्यक आयुक्त निवेदीता घार्गे,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक,प्रशासन अधिकारी साधना बोर्डे,महापालिका कर्मचारी व शहरातील तृतीयपंथी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समाजात समानतेच्या मूल्यांची रुजवणूक हीच खरी प्रगतीची दिशा आहे. पिंपरी चिंचवड महापालिका समाज विकास विभागाच्या माध्यमातून तृतीयपंथीयांच्या हक्कांसाठी त्यांना सन्मान, आधार आणि संधी देखील उपलब्ध करून देते असे सहाय्यक आयुक्त नरळे यांनी सांगितले.
आंतरराष्ट्रीय तृतीयपंथी दिनानिमित्त तृतीयपंथीय समाजाच्या आरोग्य, शिक्षण, सक्षमीकरण, आर्थिक मदत, सामाजिक योजना, मानसिक आरोग्य अशा विविध क्षेत्रात काम करणा-या व्यक्ती व संस्थांचा स्मृतीचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
1) उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तृतीयपंथीय संस्थांचा सन्मान:-
मंगलमुखी किन्नर ट्रस्ट, पुणे – सामाजिक, प्रशासकीय व मानसिक सक्षमीकरण कार्य.
उडण ट्रस्ट, पिंपरी – आरोग्यविषयक कार्य.
सावली फाउंडेशन (डॉ. अमित मोहिते) – फुटपाथ शाळा व गरजू मुलांसाठी कार्य.
दिशा मानवीय बहुउद्देशीय संस्था – महिला व तृतीयपंथीय सक्षमीकरण.
नारी द वुमन – आरोग्य सेवा, सामाजिक योजना व व्यवसाय प्रशिक्षण.
मंथन फाउंडेशन – आरोग्य, शिक्षण व सामाजिक कार्य.
जे.एस.एस.डी.टी. – ट्रान्स महिलांसाठी हेल्थ प्रोजेक्ट.
वाय.डी.ए. सेंटर फॉर यूथ डेव्हलपमेंट – प्रशिक्षण
शिखंडीत ढोल ताशा पथक – भारतातील पहिले तृतीयपंथीयांसाठी ढोल ताशा प्रशिक्षण व सांस्कृतिक केंद्र.
फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया (FPAI) – तृतीयपंथीय आरोग्य सेवा.
नवचेतना युवविकास संस्था – सामाजिक योजना
रामा तृतीयपंथीय दक्षता सामाजिक संस्था – आरोग्य व समाजकार्य.
रिलीफ फाउंडेशन – महिलांसाठी आरोग्य कार्य.
2) उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तृतीयपंथीय व्यक्तींचा सन्मान:-
पंकज बोकील (शिवन्या पाटील)
कलाकार / समाजसेवक
रफिया शेख
Miss Trans International Model
मिलिंद लबडे (मिलन)
स्पोर्ट्स – Sky Driving
विवेक तिगोटे
प्राणी संगोपक (Animal Caretaker)
सचिन वाघोडे
नृत्यदिग्दर्शक, समाजसेवक
नितू सिंग
समाजसेवक
संगीता तोबे
तृतीयपंथी समाजकार्य
डॉ. रश्मी बापट
आरोग्य विषयक कार्य
मिलिंद पळसकर
आरोग्य क्षेत्रात २० वर्षांपासून कार्यरत
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तानाजी नरळे यांनी,सूत्रसंचालन पौर्णिमा भोर यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रफुल्ल पुराणिक यांनी मानले.



0 Comments