Hot Posts

6/recent/ticker-posts

छावा मराठा सेनेच्या वतीने महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा.

 

         
       पिंपरी चिंचवड दि.०८-: आंतरराष्ट्रीय महिला दिन हा दरवर्षी ८ मार्च रोजी साजरा केला जाणारा एक सुट्टीचा दिवस आहे. महिला हक्क चळवळीतील केंद्रबिंदू म्हणून हा दिवस पाळला जातो. हा दिवस लिंग समानता, पुनरुत्पादक हक्क आणि महिलांवरील हिंसा आणि अत्याचार यासारख्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करतो. सार्वत्रिक महिला मताधिकार चळवळीमुळे उत्तेजित असणारा हा दिवस २० व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात उत्तर अमेरिका आणि युरोपमधील कामगार चळवळींमधून सुरू झाला.

        अशातच जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधून "छावा मराठा सेने" च्या वतीने पिंपरी चिंचवड येथील काळेवाडी मध्ये त्यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये महिला दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. 

     
         यावेळी छावा मराठा सेनेच्या प्रदेश महिला उपाध्यक्षा शितलताई भिसे यांनी महिलांना मार्गदर्शन करताना सांगितले की, पुरुषप्रधान संस्कृतीमध्येच व घरामध्ये चूल आणि मूल एवढ्याच मर्यादित गोष्टींमध्ये गुरफटून न राहता आपली एक स्वतंत्र ओळख निर्माण करावी, तसेही आपल्या देशामध्ये महिलांना 50 टक्के अधिकार आहेत, आज प्रत्येक महिला ही पुरुषांपेक्षा कुठल्याही क्षेत्रामध्ये कमी नाही याची जाणीव सर्व महिलांना झाली पाहिजे, तसेच प्रत्येक स्त्री ने स्वतःच्या न्याय हक्कासाठी संघटित होऊन काम केले पाहिजे. "उठ भगिनी जागी हो स्वतःच्या हक्काच्या लढाईत सहभागी हो" असा नारा ही यांवेळी शितलताई यांनी उपस्थित सर्व महिलांना दिला महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

   

 • छावा मराठा सेनेच्या महिला आघाडी च्या नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती करण्यात आल्या.

      मथुराताई काटे पिंपरी महिला अध्यक्ष, स्वातीताई दाखले काळेवाडी अध्यक्ष, सौभाग्यताई जाधव काळेवाडी कार्याध्यक्ष, वैशालीताई ढोरे  कार्याध्यक्ष पुणे जिल्हा, वैशालीताई लांडगे पिंपरी चिंचवड सल्लागार, मनीषाताई ढेपे, पिंपरी चिंचवड सचिव, सरिताताई बाहीरट भोसरी अध्यक्ष, रूपालीताई भडाळे  पुणे जिल्हा सल्लागार, अश्विनीताई काटे पिंपरी चिंचवड संपर्कप्रमुख, यांची महिला दिनानिमित्त नियुक्ती करण्यात आल्या .


     यावेळी असंख्य महिलांनी छावा मराठा सेना संघटनेमध्ये प्रवेश केला यावेळी संघटनेचे प्रदेश महासचिव सचिन भाऊ भिसे प्रदेश कार्याध्यक्ष विलास दादा पाटील पश्चिम महाराष्ट्र सचिव विशाल भाऊ भराटे  पुणे जिल्हा अध्यक्ष राहुल भाऊ धस पुणे जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण भाऊ रेड्डी पुणे जिल्हा अध्यक्ष विद्यार्थी आघाडी सनी भाऊ निकाळजे सर्व छावा मराठा सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments