Hot Posts

6/recent/ticker-posts

राहते घरामध्ये चोरी करणारे महीलेस अटक महीलेकडुन चोरीतील किं.रु.६,२९,००० /- रुपयांचे ८.७ तोळे वजनाचे सोन्याचे तसेच चांदीचे दागीने हस्तगत,


काळेवाडी तपास पथकाची कामगीरी

       पिंपरी चिंचवड -: दि. १६/१२/२०१४ रोजी नाईट एसएसओ श्री. सचिन चव्हाण यांना तक्रारदार नामे आकाश संतोष आचारी वय ३० वर्षे व्यवसाय- शॉप रा. ओम साई संतोष कॉर्नर बिल्डींग, फ्लॅट नं. ०७, नखातेवस्ती,स्पर्श हॉस्पीटल समोर,रहाटणी पुणे यांनी तक्रार दिली की, त्यांचे मुलाची तब्येत अचानक बिघडल्याने त्यास दवाखान्यात घेवुन जात असताना घराचा दरवाजा अनावधानाने उघडा राहीलेने अज्ञात चोरटयाने त्याचा फायदा घेवुन त्यांचे राहते घराचे उघडे दरवाजावाटे प्रवेश करुन घरातील सोन्याचांदीचे दागीने चोरुन नेले आहे. अशी तक्रार दिलेने ती लागलीच काळेवाडी पोलीस स्टेशन गुरजिनं.१३१५/२०२४ भा.न्या. सं. कलम ३०५ अन्वये नोंदवुन घेतली. गुन्हयामध्ये एकुण ६,२९,०००/- रुपयांचेसोन्या चांदीचे दागीने चोरीस गेले असल्याने परिमंडळ २ चे पोलीस उप आयुक्त, श्री. विशाल गायकवाड, सहायक पोलीस आयुक्त श्री. सुनिल कुराडे यांनी तात्काळ गुन्हयाचे गांभीर्य ओळखुनवपोनि. राजेंद्र बहीरट यांना तपासाबाबत सुचना व मार्गदर्शन केले.

त्याप्रमाणे राजेंद्र बहीरट वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी तपास पथकाचे पोउपनि .नागनाथ सुर्यवंशी व त्यांचे पथकास गुन्हयाचा तपास करुन आरोपीस तात्काळ अटक करणेबाबत आदेशीत केले.

काळेवाडी पोलीस ठाण्याचे तपास पथकातील पोउपनि नागनाथ सुर्यवंशी यांनी त्यांचे सोबतचे

पोलीस अंमलदार यांचे सोबत गुन्हयाचा तपास सुरु केला. फिर्यादी यांचेकडे विश्वासात घेवुन चौकशी

केली असता त्यांनी शेजारीच राहणारे महीला नामे सोनाली निलेश ओहोळ यांचेवर संशय व्यक्त

केलेने त्यांचेकडे कसून चौकशी केली असता सोनाली ओहोळ यांनी गुन्हा केलेची कबुली दिलेने

तात्काळ तपासी अधिकारी पोउपनि सचिन चव्हाण, पोउपनि नागनाथ सुर्यवंशी, पोहवा.प्रमोद कमद,

पोहवा. स्वप्निल खेतले, पोहवा. अतिश जाधव, पोशि. रमेश खेडकर, पोशि. अजय फल्ले, मपोशि. प्राजक्ता

चौगुले यांचेसह जावुन महीला आरोपीची घडझडती घेतली असता तीचे घरातुन खालील वर्णनाचे

दागीने जप्त करणेत आले.

१) १९२५००/- रु किं चे २.७५ तोळे वजनाचे सोन्याचे काळे मणी वाटया असलेले मंगळसुत्र जुवाकिंअं.

२) २६२५००/- रु किं चे ३.७५ तोळे वजनाचे सोन्याचे काळे मणी मध्ये पेंडल असलेले मंगळसुत्र

जुवाकिं.अं

३) ७००००/- रु किं चे १ तोळे वजनाचे सोन्याचे चॉकर जुवाकिंअं.

४) ३५०००/- रु किं चे अर्धा तोळे वजनाचे सोन्याचे कडे जुवाकिंअं.

५) १०५०० /-रु किं . १.५ ग्रॅम वजनाचे ३ सोन्याचे बदाम

६) ३८५००/- रु कि.५.५ ग्रॅम वजनाचे २ सोन्याचे चैन (एक ३ ग्रॅम व दुसरी २.५ ग्रॅम वजनाची )

७) २००००/- रु किं चे चांदीचे लहान मुलाचे १५ जोड बांगडया, करदोडा, जोडवे जुवाकिंअं.

६,२९,००० /- रुपये किंमतीचे ८.७ तोळे वजनाचे सोन्या चांदीचे दागीने जप्त करणेत आले असुन

महीला आरोपी नामे सौ. सोनाली निलेश ओहोळ वय ३४ वर्षे व्यवसाय - गृहीणी रा. ओम साई संतोष

कॉर्नर बिल्डींग, फ्लॅट नं.०६, नखातेवस्ती, स्पर्श हॉस्पीटल समोर,

रहाटणी पुणे यांना गुन्हयाचेकामी

अटक करणेत आली आहे. गुन्हयाचा तपास पोउपनि सचिन चव्हाण हे करीत आहेत.

सदरची उल्लेखनीय कामगीरी मा. श्री. विनयकुमार चौबे साो, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड,

मा.श्री.शशिकांत महावरकर सो, पोलीस सह आयुक्त, मा. श्री. वसंत परदेशी, अपर पोलीस आयुक्त, मा.

श्री. विशाल गायकवाड सो, पोलीस उप आयुक्त, परि-२, पिंपरी चिंचवड, मा. श्री. सुनिल कुराडे, सहा.

पोलीस आयुक्त सो, वाकड विभाग, पिंपरी चिंचवड यांचे मार्गदर्शना खाली काळेवाडी पोलीस स्टेशनचे

वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र बहीरट, पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे, पोउपनि . सचिन चव्हाण,

पोउपनि नागनाथ सुर्यवंशी, पोहवा . प्रमोद कदम, पोहवा. स्वप्निल खेतले, पोहवा. अतिश जाधव,

पोशि. रमेश खेडकर, पोशि. अजय फल्ले, मपोशि.

प्राजक्ता चौगुले, यांनी केलेली आहे.

Post a Comment

0 Comments