पिंपरी, पुणे (दि. १० नोव्हेंबर २०२४) काँग्रेसच्या केंद्रीय कमिटीचे सदस्य व स्टार प्रचारक के. के. जॉर्ज यांची काळेवाडी पिंपरी येथे सोमवारी संवाद सभा आयोजित करण्यात आली आहे अशी माहिती काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बाबू नायर यांनी प्रसिद्धीस दिली आहे.
काळेवाडी, पिंपरी येथील आरंभ बँक्वेट हॉल येथे के. के. जॉर्ज हे महाविकास आघाडीच्या पिंपरी, चिंचवड व भोसरी विधानसभेच्या उमेदवारासह प्रमुख कार्यकर्त्यांची व समाजातील विविध घटकातील प्रतिनिधींशी सायंकाळी ७:३० वाजता संवाद साधणार आहेत. या संवाद सभेस महाविकास आघाडीचे चिंचवडचे उमेदवार राहुल कलाटे, पिंपरी चे उमेदवार सुलक्षणा शीलवंत - धर आणि भोसरीचे उमेदवार अजित गव्हाणे उपस्थित राहणार आहेत. तसेच यावेळी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष कैलास कदम, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामठे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहराध्यक्ष सचिन भोसले, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव पृथ्वीराज साठे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस माजी नगरसेवक बाबू नायर, लक्ष्मी नायर तसेच सज्जी वर्की , अजि जॉन, रवी एन. पी. करीम, जॉर्ज मॅथ्यू यावेळी उपस्थित राहणार आहेत. या संवाद बैठकीस महाविकास आघाडीचे सर्व पक्ष प्रमुख पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते यांनी उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
--------------------------------------


0 Comments