Hot Posts

6/recent/ticker-posts

स्व. किसन मारुती मुळे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त किर्तनाच आयोजन...

 


                  हाजिपुर,बीड दि.०९/०८/२०२४-: हाजीपुर येथील अतिशय कष्टाळू शांत आणि संयमी असणारे व्यक्तिमत्व स्वर्गीय किसन मारुती मुळे यांचे गेल्या वर्षी दूरध्वराच्या आजाराने निधन झाले होते. पाहता पाहता एक वर्ष पूर्ण झाले असून, त्यांच्या प्रथमच पुण्यसरण दिनानिमित्त दिनांक ११/०८/२०२४ रोजी हाजीपुर येथे हरिभक्त परायण अक्षय महाराज पिंगळे यांचे सुश्राव्य असे कीर्तनाचे आयोजन केले आहे. व त्यानंतर भोजनाची व्यवस्था केलेली आहे 

         तसेच या कार्यक्रमाला परिसरातील माळकरी भजनी मंडळी सर्व उपस्थित राहणार आहेत.
             स्वर्गीय किसन मारुती मुळे हे पत्रकार बाळासाहेब मुळे यांचे वडील आहेत तरी परिसरातील सर्व नागरिकांनी या कार्यक्रमात उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांचे मुले गणेश किसन मुळे, बाळासाहेब किसन मुळे व मुलगी सौ. पंचफुला श्रीकृष्ण उगले यांनी केले आहे.
      

Post a Comment

0 Comments