पिंपरी चिंचवड दि.२ ऑगस्ट २०२४;- दिव्यांगांना सहानुभूतीने नव्हे समानुभुतीने सेवा सुविधा द्यावी असे प्रतिपादन आयुक्त शेखर सिंह यांनी केले.
पिंपरी चिंचवड महानगर पालिका दिव्यांग भवन फाउंडेशनच्या नवनियुक्त कर्मचारी प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन आयुक्त शेखर सिंह यांचे हस्ते आज पार पडले त्यावेळी ते बोलत होते.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका संचलित दिव्यांग भवन फाऊंडेशन करीता आवश्यक एकूण ३१ संवर्गाच्या थेट मुलाखती (वाॅक इन इंटरव्ह्यू)दि. १८/०६/२०२४ ते दि.२२/०६/२०२४ रोजी दिव्यांग भवन फाऊंडेशन, मोरवाडी येथे घेण्यात आलेल्या होत्या. यामध्ये ३१ प्रवर्गामध्ये एकूण ४६ जागांसाठी निवड प्रक्रिया राबविण्यात आली. यामध्ये ४० उमेदवारांची निवड झाली. या भरतीमध्ये ९ दिव्यांग व्यक्तींना निवड यादीत स्थान मिळाले आहे आणि ६ दिव्यांग प्रतीक्षा यादीत आहेत. या नवनियुक्त कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण उद्घाटन प्रसंगी एम डी ओमप्रकाश देशमुख, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, सहाय्यक आयुक्त, समाज विकास विभाग तानाजी नरळे, वाय सी एम हॉस्पिटल चे अधिष्ठाता डाॅ.राजेंद्र वाबळे आदी उपस्थित होते.

0 Comments