Hot Posts

6/recent/ticker-posts

चांगले मार्क्स असूनही हव्या त्या शिक्षणासाठी ऍडमिशन मिळत नसल्याने मराठा तरुणीची आत्महत्या.


       जालना दिनांक.१३/०७/२०२४-: शिवानी संजय हिवाळे, वय १८ वर्षदेऊळगाव ताड, ता.भोकरदन,जि. जालना. असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव असून, सध्या ज्वलंत प्रश्न असलेल्या मराठा आरक्षणा अभावी पुन्हा एक बळी गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.


      नुकतेच शिवानी ताई  ७२% गुण घेऊन बारावी उत्तीर्ण झाली होती. आतापर्यंतचे शिक्षण मामांनी केले होते. पुढील शिक्षण घेण्याची तिची खूप इच्छा होती. परंतु घरच्या हालाखीच्या परिस्थितीमुळे पुढील शिक्षणाचा खर्च झेपत नव्हता.


       या शिवाय, मराठा आरक्षण असते तर खर्च कमी लागला असता, या आशियाची चिट्ठी लिहून विहिरीत उडी घेऊन आपली जीवन यात्रा संपवली.

    शिवानी ताईला जड अंतकरणाने भावपूर्ण श्रद्धांजली.
हिवाळे परिवाराच्या दुःखात सकल मराठा समाज सहभागी आहे.

      मराठा बांधवांना हात जोडून विनंती की, तुमच्या जिवापेक्षा अधिक या जगात काहीच नाही. कोणीही असे चुकीचे पाऊल उचलू नये. 


Post a Comment

0 Comments