Hot Posts

6/recent/ticker-posts

पीएमपीच्या एक हजार बसेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरेच नाहीत; प्रवाशांची सुरक्षा धोक्यात?


         पुणे (शशिकांत पाटोळे) l दि; १३ मार्च २०२६ : पीएमपीएमएलसाठी घेण्यात येणाऱ्या एक हजार बसेसमध्ये एलएडी सिस्टिम आणि कॅमेरे नाहीत, असा आरोप आपला परिसर या संस्थेचे उज्वल केसकर यांनी केला आहे. यासंदर्भात केसकर यांनी पीएमपीएमएलचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज बी. पी. यांना निवेदन दिले आहे.

        पीएमपीएमएलला पीएमआरडीएकडून ५०० आणि पीएमसी-पीसीएमसीकडून ५०० बसेस मिळणार आहेत. त्या बसेस कंत्राटदारांना चालवायला देण्यासंदर्भात कंत्राटदारांबरोबर बैठक झाली आहे. या एक हजार बसेस येणार आहेत. त्यातील ६०० बसेस लेलँड कंपनीच्या आणि ४०० बसेस टाटा कंपनीच्या आहेत. एका गाडीची किंमत ४५ लाख ८१ हजार इतकी निश्चित केली आहे.

      या बसेसमध्ये आयटीएमएस सिस्टिमची व्यवस्था आहे. परंतु एलएडी सिस्टिम आणि कॅमेरे घेतलेले नाहीत.बस पासिंग करण्यासाठी तात्पुरत्या स्वरुपात पॅनिक बटण, जीपीएस सिस्टीम आणि माईक एवढेच घेतले आहे असे कळाले आहे, असे केसकर यांनी निवेदनात नमूद केले आहे. या दोन्ही बाबी अतिशय गंभीर आहेत.

        पीएमपीएमएलकडे एकूण ड्रायव्हरची संख्या २५५० तर कंडक्टरची संख्या ३६०० इतकी आहे. सध्या पीएमपीएमएलकडे स्वतःच्या मालकीच्या ७०० बसेस असून, प्रत्येक बसमागे २.५ कंडक्टर तर २ ड्रायव्हर लागतात अनेक ड्रायव्हर आणि कंडक्टर यांना आपण रोज काम देऊ शकत नाही. ही बाब अतिशय गंभीरपणे घेऊन गाड्यांच्या मध्ये आता लगेच सुधारणा करणे आवश्यक आहे.

       तसेच कंत्राटदाराला या गाड्या देता कामा नये, अशी मागणी केसकर यांनी केली आहे.पुण्यातील वाहतूक कोंडी लवकरच सुटणारदुसरीकडे, पुणे मेट्रो टप्पा-२ खडकवासला-स्वारगेट-हडपसर-खराडी मेट्रो मार्गिकेअंतर्गत हडपसर ते लोणी काळभोर आणि हडपसर बस डेपो ते सासवड रोड आणि रामवाडी ते वाघोली या तीन मेट्रो रेल्वे प्रकल्पांच्या उपमार्गिकांना राज्य सरकारकडून शुक्रवारी अर्थसंकल्पात मंजुरी देण्यात आली आहे.

       यामुळे शहरातील मेट्रोमार्गांबरोबर आता शहराबाहेरही मेट्रोचे जाळे विस्तारणार असून, वाहतूक कोंडीत अडकलेल्या पुणेकरांना मेट्रोच्या विस्तारामुळे दिलासा मिळणार आहे.

Post a Comment

0 Comments